सुश्मिता सेनच्या आर्या वेबसिरिजद्वारे चंद्रचुर सिंग करतोय कमबॅक, ओळखणे देखील जातंय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 08:00 AM2020-06-10T08:00:00+5:302020-06-10T08:00:02+5:30

चंद्रचुरचा काही वर्षांपूर्वी एक अपघात झाला होता, तेव्हापासून तो अभिनयक्षेत्रापासून दूर आहे.

Sushmita Sen welcomes Aarya co-star Chandrachur Singh back to acting | सुश्मिता सेनच्या आर्या वेबसिरिजद्वारे चंद्रचुर सिंग करतोय कमबॅक, ओळखणे देखील जातंय कठीण

सुश्मिता सेनच्या आर्या वेबसिरिजद्वारे चंद्रचुर सिंग करतोय कमबॅक, ओळखणे देखील जातंय कठीण

googlenewsNext
ठळक मुद्देसुश्मिताने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत चंद्रचुरचे अभिनयक्षेत्रात वेलकम केले आहे. या व्हिडिओत आपल्याला तिच्यासोबत चंद्रचुर आणि प्रियाशा भारद्वाज देखील दिसत आहे.

तेरे मेरे सपने’ या चित्रपटाद्वारे अ‍ॅक्टिंगच्या दुनियेत पाऊल ठेवणारा अभिनेता चंद्रचुर सिंग गेल्या अनेक वर्षांपासून अभिनयक्षेत्रापासून दूर आहे. पण आता तो लवकरच अभिनयक्षेत्रात कमबॅक करत आहे.



सुश्मिता सेनच्या आर्या या वेबसिरिजची सध्या चांगलीच चर्चा आहे. ही वेबसिरिज प्रेक्षकांना हॉटस्टारवर पाहायला मिळणार आहे. या वेबसिरिजचे दिग्दर्शन राम माधवानी, संदीप मोदी आणि विनोद रावत करत असून या वेबसिरिजद्वारे चंद्रचुर अभिनक्षेत्रात कमबॅक करत आहे. सुश्मिताने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत चंद्रचुरचे अभिनयक्षेत्रात वेलकम केले आहे. या व्हिडिओत आपल्याला तिच्यासोबत चंद्रचुर आणि प्रियाशा भारद्वाज देखील दिसत आहे. प्रियाशादेखील आर्यामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या व्हिडिओसोबत सुश्मिताने लिहिले आहे की, आर्याद्वारे कमबॅक केल्याबद्दल खूप सारे आभार... चंद्रचुर केवळ एक चांगला अभिनेताच नव्हे तर एक चांगला व्यक्ती देखील आहे.



‘माचिस’ या चित्रपटाने चंद्रचुर सिंगला खरी ओळख दिली. या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कारही मिळाला. ‘चप्पा चप्पा चरखा चले’ या गाण्यातील चंद्रचुर सिंग आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. ‘माचिस’ नंतर त्याने दिल क्या करे, दाग द फायर, जोश, क्या कहेना, आमदनी अठ्ठन्नी और खर्चा रूपय्या अशा विविध सिनेमात भूमिका साकारल्या. जोश’मध्ये चंद्रचुर ऐश्वर्या रायसोबत स्क्रिन शेअर करताना दिसला. ऐश्वर्या रायचा चंद्रचुर आवडता अभिनेता होता. खुद्द ऐश्वर्याने एका मुलाखतीत ही कबुली दिली होती. चंद्रचुरने एकापाठोपाठ एक डझनावर चित्रपटांत काम केले. पण यानंतर अचानक तो गायब झाला. त्याला चित्रपटांच्या ऑफर मिळणे बंद झाले आणि चंद्रचुर हळूहळू बॉलिवूडमध्ये दिसेनासा झाला.


याचदरम्यान २००० साली मुंबईत बोटिंग करताना चंद्रचुरला गंभीर अपघात झाला. या अपघातात त्याच्या दोन्ही खांद्यांना जबर दुखापत झाली होती. ही दुखापत इतकी गंभीर होती की त्यातून सावरण्यासाठी त्याला तब्बल १० वर्षं लागली. यात त्याने कमावलेला सगळा पैसा देखील गेला... करिअर ठप्प पडले आणि तो आर्थिक संकटात सापडला.



अर्थात यानंतरही चंद्रचुरने हिंमत सोडली नाही. ‘चार दिन की चांदनी’ या चित्रपटातून त्याने कमबॅक केले. पण त्याचा हा कमबॅक चित्रपट दणकून आपटला. पैशांसाठी या काळात चंद्रचूडने अनेक छोट्या मोठ्या भूमिका केल्यात. अगदी मिळेल ते काम स्वीकारले. पण त्याच्या करिअरची गाडी पुन्हा रूळावर येऊ शकली नाही. ‘The Reluctant Fundamentalist’ हा त्याचा अखेरचा सिनेमा होता. आता तो वेबसिरिजच्या माध्यमातून अभिनयक्षेत्रात कमबॅक करत आहे. चंद्रचुड आता खूपच बदलला असून त्याला ओळखणे देखील कठीण जात आहे. 

Web Title: Sushmita Sen welcomes Aarya co-star Chandrachur Singh back to acting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.