सुशांत सिंग राजपूतच्या डॉग फजचा नवीन व्हिडीओ आला समोर, व्हिडीओ पाहून व्हाल इमोशनल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 11:06 AM2021-01-12T11:06:51+5:302021-01-12T11:07:18+5:30

सुशांत सिंग राजपूतने १४ जून रोजी मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती.

Sushant Singh Rajput's new video of Dog Faj has come out, you will see the video, you will be emotional | सुशांत सिंग राजपूतच्या डॉग फजचा नवीन व्हिडीओ आला समोर, व्हिडीओ पाहून व्हाल इमोशनल

सुशांत सिंग राजपूतच्या डॉग फजचा नवीन व्हिडीओ आला समोर, व्हिडीओ पाहून व्हाल इमोशनल

googlenewsNext

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची भाची मल्लिका सिंग नेहमी इंस्टाग्रामवर सुशांतचे ना पाहिलेले आणि जुने फोटो शेअर करत करत असते. मामाच्या आठवणींना उजाळा देत असते. नुकताच तिने फजचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे जो पाहून चाहते इमोशनल झाले आहेत. 

इंस्टा स्टोरीवर मल्लिका सिंगने दिवंगत मामा सुशांत सिंग राजपूतचा पाळीव कुत्रा फजचा व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात तो लॉनवर चालताना दिसतो आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर फजला त्यांच्या पटना येथील घरी नेण्यात आले. तिथे तो सुशांतच्या वडिलांसोबत वेळ व्यतित करताना नेहमी दिसतो. सुशांतच्या निधनाला आता ७ महिने होत आले आहेत.


काही महिन्यांपूर्वी मल्लिका सिंगने आपल्या बालपणीचा जुना फोटो शेअर करत कॅप्शन दिले होते की, माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे, माझे गुलशन मामा. मला तुमची खूप आठवण येते.


सुशांत सिंग राजपूतने १४ जून, २०२० रोजी वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली, त्याच्या निधनाच्या बातमीने सर्वांना धक्का बसला. त्याच्या मृत्यूनंतर घरातले आणि चाहत्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती.

त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. सीबीआयने चौकशीला सुरूवात केल्यानंतर ड्रग्स कनेक्शन समोर आले. त्यात रिया चक्रवर्तीला अटक झाली. सध्या ती जामिनावर आहे. 

Web Title: Sushant Singh Rajput's new video of Dog Faj has come out, you will see the video, you will be emotional

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.