या तीन कारणांमुळे NCB समोर रिया चक्रवर्तीचं पितळ पडलं उघडं, जाणून घ्या काय आहेत ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 20:47 IST2020-09-08T20:40:16+5:302020-09-08T20:47:46+5:30

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात गेल्या अनेक दिवसांपासून रिया आणि तिच्या कुटुंबाची चौकशी सुरु आहे.

Sushant singh rajput rhea chakraborty arrested by ncb three reasons are behind | या तीन कारणांमुळे NCB समोर रिया चक्रवर्तीचं पितळ पडलं उघडं, जाणून घ्या काय आहेत ती?

या तीन कारणांमुळे NCB समोर रिया चक्रवर्तीचं पितळ पडलं उघडं, जाणून घ्या काय आहेत ती?

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात गेल्या अनेक दिवसांपासून रिया आणि तिच्या कुटुंबाची चौकशी सुरु आहेत. तीन दिवसांच्या चौकशीनंतर एनसीबीने रियाला अटक केले आहे. असे नेमकं काय घडले ज्यामुळे रिया चक्रवर्तीने खरं सांगण्यास सुरुवात केली. जी रिया चक्रवर्ती सुरुवातील ड्रग्स घेण्याचे नकारत होती त्याच रियाने एनसीबीसमोर ड्रग्स घेतल्याचे कबुल केले. जाणून घ्या या मागची तीन कारण...

रियाचा झाला होता भावाशी सामना
शौविकची एनसीबीने स्वतंत्र चौकशी केली आणि नंतर सॅम्युअल मिरांडासमोर केले. यात या गोष्टीचा खुलासा झाला की शौविक ड्रग्सचे सेवन करायचा. एवढेचंं नाही तर रिया आणि शौविकचे चॅटदेखील व्हायरल झाले. रियाला भाऊ शौविकसमोर बसून चौकशी करण्यात आली. भावासमोर झालेल्या चौकशीत रिया खूप भावूक झाली आणि तिला रडू कोसळले. अशात रियाचे कमजोर पडण्याचे हे देखील एक कारण असू शकते. 


सॅम्युअलचा जबाब
एनसीबीच्या टीमने रिया आणि सॅम्युअलच्या घरावर छापा टाकले. यानंतर शौविक आणि सॅम्युअल मिरांडाला एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी आणण्यात आले. चौकशी दरम्यान सॅम्युअलने रियाच्या ड्रग्स कनेक्शनबाबत अनेक खुलासे केले. त्याचसोबत सुशांतच्या हॉम हाऊसवर होणाऱ्या पार्टीबाबत आणि त्यात सहभागी होणाऱ्याची नावं एनसीबीला दिली. हेदेखील  एक कारण असू शकतं रियाला अटक होण्याचे. 

भावासमोर खोटं बोलू शकली नाही रिया
रिया चक्रवर्तीने एनसीबीसमोर कबुली दिली जाण्यामागील प्रमुख कारण म्हणजे तिच्यासमोर तिचा भाऊ होता. यापूर्वीच शौविक ड्रग्सची कबुली दिली होती, त्यानंतर तो 9 सप्टेंबरपर्यंत ताब्यात घेण्यात आले. भावाला असे पाहिल्यावर रिया खोटं बोलू शकली नाही आणि ती तुटली. 

‘सॉरी बाबू’! रियाच्या अटकेनंतर सुशांतचे चाहते झालेत अ‍ॅक्टिव्ह; ट्विटरवर मजेदार मीम्सचा पूर

 

Web Title: Sushant singh rajput rhea chakraborty arrested by ncb three reasons are behind