‘मिस्ट्री गर्ल’? आता मात्र अती झाले... !  फरहान अख्तरची गर्लफ्रेन्ड शिबानी भडकली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 11:25 IST2020-08-25T11:22:28+5:302020-08-25T11:25:01+5:30

शिबानी का भडकली तर सुशांत सिंग राजपूत प्रकरणाशी नाव जोडले गेल्याने...

sushant singh rajput death case shibani dandekar reveals who is that mystery girl | ‘मिस्ट्री गर्ल’? आता मात्र अती झाले... !  फरहान अख्तरची गर्लफ्रेन्ड शिबानी भडकली 

‘मिस्ट्री गर्ल’? आता मात्र अती झाले... !  फरहान अख्तरची गर्लफ्रेन्ड शिबानी भडकली 

ठळक मुद्देशिबानीच्या या  ट्वीटवर अनेकांनी कमेंट्स दिल्यात. यापैकी ब-याच लोकांनी तिला ट्रोल केले.

अभिनेता फरहान अख्तरची गर्लफ्रेन्ड शिबानी दांडेकर सध्या जाम भडकलीय. सोशल मीडियावर तिने आपला संताप व्यक्त केला. आता शिबानी का भडकली तर सुशांत सिंग राजपूत प्रकरणाशी नाव जोडले गेल्याने.
होय, सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूच्या दिवशी त्याच्या घराबाहेर दिसलेली ती मिस्ट्री गर्ल म्हणजे शिबानी दांडेकर असल्याचा दावा काही लोकांनी केला आणि याचमुळे शिबानी संतापली.
अलीकडे सुशांत प्रकरणाशी संबंधित काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. एका व्हिडीओत ही मिस्ट्री गर्ल दिसली होती. सुशांतच्या मृत्यूनंतर घटनास्थळी तपास सुरु असताना एक ब्ल्यू स्ट्रिपचा टॉप आणि बेज शॉर्टसमधील एक मिस्ट्री गर्ल व्हिडीओत दिसली होती.तिच्याबाबत अनेक दावे देखील करण्यात आले होते. ही मिस्ट्री गर्ल दुसरी-तिसरी कुणी नसून रिया चक्रवर्तीची मैत्रिण आणि फरहान अख्तरची गर्लफ्रेंड शिबानी दांडेकर असल्याचा दावाही केला गेला होता. सोशल मीडियावर करण्यात आलेल्या या दाव्यानंतर शिबानीने संतापून ट्वीटरवर एक पोस्ट लिहिली. 

 

‘ ही मी नाही आहे आणि सिमोन देखील नाही आहे. ऊठसूठ दावे करण्याआधी सत्यपडताळणी करून घ्या. ही सुशांत सिंह राजपूतची पीआर पर्सन आणि असिस्टंट राधिका निहलानी आहे. फेक न्यूज पसरवणे बंद करा. आता खूप झाले. माझी शांतता तुम्हाला असत्य आणि द्वेष पसरवण्याचा कोणताही हक्क देत नाही, अशा शब्दांत तिने आपला राग व्यक्त केला.


शिबानीच्या या  ट्वीटवर अनेकांनी कमेंट्स दिल्यात. यापैकी ब-याच लोकांनी तिला ट्रोल केले. एका युजरने ती मिस्ट्री गर्ल राधिक निहलानीसारखी दिसत नसल्याचे म्हटले. अन्य एका युजरने तर शिबानीलाच धारेवर धरले. आम्ही तुझ्यावर का म्हणून विश्वास ठेवावा, असा उलट सवाल या युजरने केला.

Web Title: sushant singh rajput death case shibani dandekar reveals who is that mystery girl