सुशांत सिंग राजपूत आणि रिया चक्रवर्तीला २०२० मध्ये सर्वात जास्त केले गेले सर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2020 11:16 AM2020-12-02T11:16:06+5:302020-12-02T11:17:08+5:30

सुशांत सिंग राजपूत मोस्ट सर्च मेल सेलिब्रेटी कॅटेगिरीमध्ये सर्वात अव्वल स्थानावर आहे.

Sushant Singh Rajput and Riya Chakraborty were the most searched in 2020 | सुशांत सिंग राजपूत आणि रिया चक्रवर्तीला २०२० मध्ये सर्वात जास्त केले गेले सर्च

सुशांत सिंग राजपूत आणि रिया चक्रवर्तीला २०२० मध्ये सर्वात जास्त केले गेले सर्च

googlenewsNext

सर्च इंजिन याहू दरवर्षी प्रमाणे यावर्षीदेखील भारतात सर्वात जास्त सर्च केलेल्या लोकांची यादी जाहीर केली आहे. यात २०२० वर्षात लोकांनी सर्वात जास्त दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतला सर्च केले आहे. तर त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्ती सर्वात जास्त सर्च केलेली महिला सेलिब्रेटी आहे. यावर्षी जूनमध्ये वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. यावर्षीच्या यादीत दहाव्या स्थानावर राजकीय सेलिब्रेटींचा समावेश आहे.


२०१७ नंतर हे पहिले वर्ष आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी या यादीत पहिल्या क्रमांकावर नाही आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तिसऱ्या स्थानावर रिया आहे. त्यानंतर राहुल गांधी, अमित शाह, उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, अमिताभ बच्चन आणि कंगना राणौत यांचा या यादीत समावेश आहे.


सुशांत सिंग राजपूत मोस्ट सर्च मेल सेलिब्रेटींच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. मग अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, सलमान खान, इरफान खान आणि ऋषी कपूर यांचा समावेश आहे. रिया यावर्षीची मोस्ट सर्च फिमेल सेलिब्रेटीच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे.


२०२० वर्षात टॉप न्यूजमेकर्सबद्दल सांगायचं तर पीएम मोदी नंबर वनवर आहेत. सुशांत आणि रिया दुसऱ्या क्रमांकावर आणि राहुल गांधी तिसऱ्या स्थानकावर आहे.
अभिनेता सोनू सूदला या यादीत एक विशेष स्थान मिळाले आहे. त्याला हिरो ऑफ द इअर म्हणून निवडले आहे. कोरोनाच्या काळात लोकांना त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी मदत केल्यामुळे त्याचे खूप कौतूक झाले आहे. 

Web Title: Sushant Singh Rajput and Riya Chakraborty were the most searched in 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.