-रवींद्र मोरे
बॉलिवूडमध्ये आज अभिनेत्यांबरोबरच अभिनेत्रींचाही बोलबाला सुरू आहे. अशातच बॉलिवूडमध्ये काही अभिनेत्र्या अशा आहेत ज्यांनी कमी वयात एक मोठे यश संपादन केले आहे. आज आपण अशाच अभिनेत्रींबाबत जाणून घेऊया ज्यांनी अगदी कमी वयात उंच भरारी घेत यशोशिखर गाठले आहे...

* निधि अग्रवाल


१७ ऑगस्ट, १९९३ मध्ये जन्म झालेली निधि अग्रवाल आज २५ वर्षाची आहे. निधिने टायगर श्रॉफसोबत ‘मुन्ना मायकल’ द्वारा बॉलिवूड डेब्यू केला होता. निधि आपल्या बिनधास्त अ‍ॅटिट्यूड आणि शानदान डान्सिंग मूव्जद्वारा सर्वांचे मन जिंकण्यात यशस्वी झाली आहे.

* सारा अली खान


१२ ऑगस्ट, १९९५ रोजी सारा अली खानचा जन्म झाला होता. २३ वर्षीय सारा अली खानने ‘केदारनाथ’ द्वारा बॉलिवूड डेब्यू केला होता. त्यानंतर रणवीर सिंह सोबत ‘सिंबा’ चित्रपटात यशस्वी भूमिका साकारत सर्वांना चकित केले. या दोन्हीही चित्रपटात साराने खूप प्रशंसा मिळविली. सारा अली खानचा आगामी चित्रपट कार्तिक आर्यनसोबत आहे ज्याचे दिग्दर्शन इम्तियाज अली करत आहे.

* तारा सुतारिया१९ नोव्हेंबर, १९९५ रोजी जन्म झालेल्या २३ वर्षीय तारा सुतारियाने 'स्टूडेंट ऑफ द ईयर 2' द्वारा डेब्यू केला होता. या चित्रपटात तारासोबत टायगर श्रॉफदेखील होता. ताराने आपल्या लुक्ससोबतच आपल्या अ‍ॅक्टिंगद्वाराही सर्वांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. तारा आगामी चित्रपट ‘आरएक्स 100’च्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे.

* अनन्या पांडे


३० ऑक्टोबर, १९९८ रोजी जन्म झालेल्या अनन्या पांडेचे वय केवळ २० वर्ष आहे. अगदी कमी वयातच अनन्याने बॉलिवूडमध्ये आपले नाव कमविले आहे. ताराने ‘सोटी 2’ द्वारा बॉलिवूड डेब्यू केला होता. ती आगामी चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत दिसणार आहे.

* जान्हवी कपूर


६ मार्च, १९९७ रोजी जन्म झालेल्या जान्हवी कपूरचे वय २२ वर्ष आहे. ‘धडक’ चित्रपटाद्वारा बॉलिवूड डेब्यू करणारी जान्हवीची पहिल्याच चित्रपटातून तिची आई श्रीदेवीसोबत तुलना होऊ लागली होती. जान्हवीचा आगामी चित्रपट गुंजन सक्सेनाचा बायोपिक आहे.

* आलिया भट्ट


१५ मार्च, १९९३ रोजी जन्म झालेली आलिया भट्ट केवळ २६ वर्षाची आहे. मात्र आपला दमदार अभिनय आणि क्यूट लुक्समुळे आज ती बॉलिवूडच्या टॉप अ‍ॅक्ट्रेसेसच्या यादीत समाविष्ट झाली आहे. आलिया सड़क 2, रणबीरसोबत ब्रह्मास्त्र आणि सलमान खानसोबत इंशाअल्लाह या अपकमिंग चित्रपटात दिसणार आहे.

Web Title: successful youngest-actresses-of-the-bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.