ठळक मुद्दे निकिताचे प्रेमप्रकरण दर्शन या दाक्षिणात्य अभिनेत्यासोबत सुरू होते. दर्शन आणि निकिताचे प्रेमप्रकरण सुरू होते, त्यावेळी दर्शनचे लग्न झालेले होते आणि याविषयी निकिताला माहीत देखील होते.

एखाद्या अभिनेत्रीवर कोणत्याही इंडस्ट्रीत काम करण्यास बंदी घालण्यात आली होती असे तुम्हाला कोणी सांगितले तर तुम्ही त्यावर विश्वास ठेवाल का? हो, हे खरे आहे. एका विशिष्ट कारणामुळे एका अभिनेत्रीवर चक्क तीन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. पण सगळीकडून विरोध झाल्यानंतर ही बंदी मागे घेण्यात आली होती. 

निकिता ठुकराल या अभिनेत्रीने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. निकिताचे शिक्षण मुंबईत झाले असून ती एका मालिकेच्या तंत्रज्ञानाच्या टीमसोबत काम करत होती. त्यानंतर तिने तेलगू चित्रपटाद्वारे तिच्या अभिनयप्रवासाला सुरुवात केली. गेल्या काही वर्षांत तिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत तिची एक खास जागा निर्माण केली आहे. तिला तिच्या अभिनयासाठी आजवर अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

निकितावर कन्नड चित्रपटसृष्टीने तीन वर्षांसाठी बंदी घातली होती. तिच्यावर बंदी घालण्यामागचे एक खास कारण होते. निकिताचे प्रेमप्रकरण दर्शन या दाक्षिणात्य अभिनेत्यासोबत सुरू होते. दर्शन आणि निकिताचे प्रेमप्रकरण सुरू होते, त्यावेळी दर्शनचे लग्न झालेले होते आणि याविषयी निकिताला माहीत देखील होते. दर्शनच्या पत्नीने दर्शनविरोधात तक्रार दाखल केली होती.

तिने तक्रारीत म्हटले होते की, दर्शन तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करतो आणि त्यासाठी केवळ निकिता जबाबदार आहे. निकिताने हे सगळे आरोप फेटाळून लावले होते. दर्शनच्या पत्नीकडे तिने या गोष्टींचा तिच्याकडे काही पुरावा आहे का असे देखील विचारले होते. पण या सगळ्या आरोपांनंतर निकितावर तीन वर्षांची बंदी कन्नड प्रॉडक्शन असोसिएशनने घातली होती. या सगळ्यामुळे निकिताला चांगलेच टेन्शन आले होते आणि तिची तब्येत देखील ढासळली होती. या तिच्या बंदीवर कन्नड इंडस्ट्रीतील काही लोकांनी विरोध केल्यानंतर तिच्यावरील बंदी काही दिवसांनी मागे घेण्यात आली होती. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: South industry imposed ban on Indian Actress Nikita Thukral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.