भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची बायोपिकची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहे.अलीकडेच एक बातमी आली होती की सौरभ गांगुलीच्या बायोपिकमध्ये हृतिक रोशन आपली भूमिका साकारु शकतो. ह्रतिक रोशनला सुद्धा सौरभ गांगुलीची भूमिका साकारण्यासाठी काही हरकत नाही पण त्याने त्यासाठी अट ठेवली आहे.

सौरभ गांगुलीने ठेवली अट
सौरभ गांगुलीचा बायोपिक गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अलीकडेच नेहा धुपियाने तिच्या चॅट शोमध्ये सौरभ गांगुलीला याबाबत प्रश्न विचारला. आपल्या भूमिकेत कोणता अभिनेता बघायचा आहे, जेव्हा हृतिक रोशनचे नाव त्यांना सुचविण्यात आले तेव्हा त्यांने म्हटलं की, आधी हृतिकला त्याच्यासारखी बॉडी तयार करावी लागेल.

सौरभ म्हणाला, त्याला आधी माझ्यासारखी बॉडी बनवावी लागेल. लोक म्हणतात की, हृतिक रोशनची बॉडी किती चांगले आहे, पण माझ्या बायोपिकमध्ये काम करण्यासाठी माझ्यासारखी बॉडी बनवावी लागले. 

 ह्रतिकने 2019 मध्ये दोन बॅक टू बॅक हिट दिले होते आणि वॉर सर्वाधिक कमाई करणारी फिल्म आहे. २०१९ मध्ये आपल्या दमदार अभिनय आणि परफॉर्मेंससोबत ऋतिकचा बोलबाला बघायला मिळाला होता ज्यात 300 करोड़ क्लबमध्ये प्रवेश करत त्याने सर्व रेकॉर्ड तोडले होते. लवकरच ह्रतिक होम प्रॉडक्शन 'कृष 4' मध्ये दिसणार आहे. सध्या या सिनेमाची स्क्रिप्ट लिहिली जाते आहे. यावर्षाच्या अखेरीस सिनेमाची शूटिंग सुरु होण्याची शक्यता आहे. 

'अगर तुम छोड़ दोगे तो मैं', सुजैन खानच्या या पोस्टवर ह्रतिक रोशनने अशी दिली रिअ‍ॅक्शन

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sourav ganguly talks about hrithik roshan lead role in his biopic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.