Hrithik roshan commen viral on exwife sussanne khan photo know what he wrote | 'अगर तुम छोड़ दोगे तो मैं', सुजैन खानच्या या पोस्टवर ह्रतिक रोशनने अशी दिली रिअ‍ॅक्शन

'अगर तुम छोड़ दोगे तो मैं', सुजैन खानच्या या पोस्टवर ह्रतिक रोशनने अशी दिली रिअ‍ॅक्शन

सुजैन खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती नेहमी शेअर करताना दिसते. याच दरम्यान सुजैन एक लक्षवेधी फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामुळे सुजैन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या फोटोसोबत सुझान कॅप्शन सुद्धा दिले आहे. सुजैनच्या या फोटोवर एक्स पती ह्रतिक रोशनने सुद्धा कमेंट केली आहे. 


 
सुझानने इन्स्टाग्रामवर स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत सुझान एक खुर्चीवर बसलेली दिसते आहे. सुजैन या फोटोला कॅप्शन देताना लिहिले की, ''जरी तू मला सोडून गेलास तर मी रडणार नाही. मी माझा एकही दिवस व्यर्थ नाही घालवणार.'' सुजैनच्या या फोटोवर ह्रतिकने कमेंट करताना सुपर पिक असे म्हटले आहे. सुजैन एक यशस्वी बिझनेसव्हुमन आहे.  इंटिरियर डिजाइनिंगच्या जगात सुजैन खाने हे एक प्रसिद्ध नाव आहे. बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक संजय खान यांची ती मुलगी असूनही तिने कधी अभिनयात रस दाखवला नाही. 

लॉकडाऊनमध्ये आले एकत्र
सुजैन व हृतिकचा घटस्फोट झालाय. पण लॉकडाऊनपासून सुजैन हृतिकच्या घरी राहतेय. मुलांसाठी तिने हा निर्णय घेतला होता. लॉकडाऊनच्या काळात माझ्या दोन्ही मुलांना आई व बाबा दोघांची गरज आहे. अशावेळी मी त्यांना एकटे सोडू शकत नाही. लॉकडाऊन आहे तोपर्यंत मी माझ्या मुलांसोबतच राहणार असे सुजैनने म्हटले होते.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Hrithik roshan commen viral on exwife sussanne khan photo know what he wrote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.