SOTY 2: Aditya Seal gets trolled for comparing Student of the Year 2 to Avengers, netizens call him ‘foolish’ | SOTY 2 : भाई दिमाग खोखला है क्या एकदम...! लोकांनी घेतला आदित्य सीलचा क्लास!!
SOTY 2 : भाई दिमाग खोखला है क्या एकदम...! लोकांनी घेतला आदित्य सीलचा क्लास!!

ठळक मुद्दे‘स्टुडंट आॅफ द इअर 2’ या चित्रपटात टायगर श्रॉफ, अनन्या पांडे, तारा सुतारिया लीड रोलमध्ये आहेत. आदित्य सील या चित्रपटात बॅड बॉय रूपात आहे.

‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ने चाहत्यांना अक्षरश: वेड लावले आहे. आत्तापर्यंतच्या सर्व हॉलिवूडपटांना मागे टाकत,‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ बॉक्सआॅफिसवर कब्जा केला आहे. केवळ इतकेच नाही तर बॉलिवूड चित्रपटांनाही ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ने जोरदार मात दिली आहे. करण जोहरचा मोठा गाजावाजा करून प्रदर्शित झालेला ‘स्टुडंट आॅफ द इअर 2’ हा चित्रपटही ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’पुढे टिकू शकला नाही. अशात कुणी ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’शी ‘स्टुडंट आॅफ द इअर 2’ची तुलना केली तर काय होईल? लोक तुलना करणा-याला वेड्यात काढतील. अभिनेता आदित्य सील याला लोकांनी असेच वेड्यात काढले आहे.
‘स्टुडंट आॅफ द इअर 2’ला टुकार चित्रपट म्हणणा-यांना उत्तर देण्याच्या नादात आदित्यने या चित्रपटाची तुलना ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’शी केली आणि लोकांनी त्याला अक्षरश: वेड्यात काढले. ‘समाजाचा एक वर्ग ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’पाहून त्याचे कौतुक करतो, सुपरहिरो खरोखरच असतात, यावर विश्वास ठेवता आणि त्याचवेळी आमच्या चित्रपटावर टीका करतो,’असे आदित्यने लिहिले. आदित्यने हे म्हटले आणि लोकांनी त्याला ट्रोल करणे सुरु केले. ‘भाई दिमाग खोखला है क्या एकदम...’, असे एका युजरने आदित्यला सुनावले.अन्य एका युजरने तर आदित्यची चांगलीच फिरकी घेतली. ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ मी सिनेमा हॉलमध्ये जाऊन चारदा पाहिला आणि प्रत्येकवेळी रडलो. पण ‘स्टुडंट आॅफ द इअर 2’ मी मोबाईलवर पाहिला आणि माझा अनमोल वेळ का वाया घालवला म्हणून रडलो, असे या युजरने लिहिले.
‘स्टुडंट आॅफ द इअर 2’ या चित्रपटात टायगर श्रॉफ, अनन्या पांडे, तारा सुतारिया लीड रोलमध्ये आहेत. चित्रपटाने आत्तापर्यंत केवळ ३८.८३ कोटींची कमाई केली आहे. आदित्य सील या चित्रपटात कॅम्पसच्या बॅड बॉय रूपात आहे. पुनीत मल्होत्राने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.

Web Title: SOTY 2: Aditya Seal gets trolled for comparing Student of the Year 2 to Avengers, netizens call him ‘foolish’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.