OMG ! म्हातारपणी कशी दिसेल सोनम कपूर?  स्वत:च शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 11:20 AM2019-07-14T11:20:48+5:302019-07-14T11:21:02+5:30

सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असलेली सोनम चाहत्यांशी रोज काहीतरी नवे शेअर करत असते. सध्या तिने एक धम्माल फोटो शेअर केला आहे.

sonam kapoor shares fan made photoshopped pic how she look in old age | OMG ! म्हातारपणी कशी दिसेल सोनम कपूर?  स्वत:च शेअर केला फोटो

OMG ! म्हातारपणी कशी दिसेल सोनम कपूर?  स्वत:च शेअर केला फोटो

googlenewsNext
ठळक मुद्देसोनम सध्या ‘झोया फॅक्टर’ या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटात सोनमसोबत साऊथ अभिनेता दुलकर सलमान लीड रोलमध्ये आहे.

बॉलिवूडची फॅशनिस्टा सोनम कपूर म्हणजे, एक बिनधास्त व्यक्तिमत्त्व. तिच्या अभिनयाचे कौतुक होतेच. पण सोबत तिच्या फॅशन आणि स्टाईल स्टेटमेंटचेही लोक कौतुक करतात. बहीण रिया कपूरसोबत फॅशन ब्रँड लॉन्च करण्यापासून तर अभिनयापर्यंत आणि आनंद अहुजासोबतच्या लग्नापर्यंत सोनम कायम चर्चेत राहिली. सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असलेली सोनम चाहत्यांशी रोज काहीतरी नवे शेअर करत असते. सध्या तिने एक धम्माल फोटो शेअर केला आहे. म्हातारपणी सोनम कपूर कशी दिसेल, असा प्रश्न असलेल्यांना तिचा हा फोटो पाहून उत्तर मिळेल.
खरे तर म्हातारपणाचे नाव काढले तरी अनेकांना भीती वाटते. अभिनयाच्या क्षेत्रात असलेली प्रत्येक व्यक्ती चिरतरूण राहू इच्छिते. पण सोनम कपूरला कदाचित ही भीती नाही. होय,कारण सोनमने आत्ताच ती ती म्हातारपणी कशी दिसेल, याचे उत्तर देणारा फोटो शेअर केला आहे.

सोनमच्या एका फॅनने हा फोटो फोटोशॉप्ड केला आहे. ‘75-80 वर्षांची झाली की ती अशी दिसेल. पण ती सुंदर आहे...नेहमीसाठी सुंदर,’ असे सोनमने हा फोटो शेअर करताना लिहिले आहे.


आज सोनमने बॉलिवूडमध्ये आपली एक जागा निर्माण केली आहे. सावरिया या चित्रपटाद्वारे तिने तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. दिल्ली 6, रांजना, खुबसुरत, प्रेम रतन धन पायो, नीरजा, पॅडमॅन यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने उत्तम भूमिका साकारल्या आहेत.  

आनंद आहुजा या व्यवसायिकासोबत तिचे लग्न झाले असून ते दोघे अनेक वर्षं नात्यात होते. सोनम सध्या ‘झोया फॅक्टर’ या चित्रपटात बिझी आहे. लेखिका अनुजा चौहान यांच्या याच नावावर आधारित पुस्तकावर हा चित्रपट बेतलेला आहे. या चित्रपटात सोनमसोबत साऊथ अभिनेता दुलकर सलमान लीड रोलमध्ये आहे. अभिषेक शर्मा दिग्दर्शित हा सिनेमा येत्या 20 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

Web Title: sonam kapoor shares fan made photoshopped pic how she look in old age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.