डुक्करासोबत कधीच कुस्ती करू नये...! सोनम कपूरची ही पोस्ट कंगनासाठी तर नाही ना?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 02:01 PM2020-09-04T14:01:27+5:302020-09-04T14:01:45+5:30

सोनम कायम कंगनाच्या हिटलिस्टमध्ये राहिली आहे. आता सोनमने कंगनाला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

sonam kapoor post no fight with pig target Kangana Ranaut's on her PoK remark | डुक्करासोबत कधीच कुस्ती करू नये...! सोनम कपूरची ही पोस्ट कंगनासाठी तर नाही ना?

डुक्करासोबत कधीच कुस्ती करू नये...! सोनम कपूरची ही पोस्ट कंगनासाठी तर नाही ना?

googlenewsNext
ठळक मुद्दे सोनमच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे सध्या ती ‘वीरे दी वेडिंग’ या सिनेमाच्या सिक्वलची तयारी करत आहे.

अभिनेत्री कंगना राणौतच्या एका tweetने देशात जणू भूकंप आला आहे. देशाची मायानगरी म्हणून ओळखल्या जाणा-या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर अर्थात POKशी करून कंगनाने बॉलिवूड सेलिब्रिटीच नाही तर राजकीय नेत्यांशीही पंगा घेतला आहे. कंगना तिच्या वक्तव्यामुळे जोरदार ट्रोल होत आहे.. अनेक सेलिब्रिटींनी तिच्यावर परखड टीका केली आहे. अभिनेत्री सोनम कपूर हिनेही ‘इशारों इशारों में’ कंगनाला लक्ष्य केले आहे. डुक्करासोबत कधीच कुस्ती करू नये. कारण चिखलात आपणच घाणेरडे होतो आणि डुकरांना चिखल आवडत असतो, अशी पोस्ट तिने केली आहे.

सोनम कपूरची पोस्ट
 कंगनाच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर सोनम कपूरने  एक पोस्ट शेअर केली आहे.   प्रख्यात लेखक जॉर्ज बर्नार्ड यांचे प्रसिद्ध वाक्य कोट करत तिने लिहिले, ‘मी खूप पूर्वी शिकले आहे की, डुक्करासोबत कधीच कुस्ती करू नये. कारण चिखलात आपणच घाणेरडे होतो आणि डुकरांना चिखल आवडत असतो.’  

 तुफान व्हायरल होतेय पोस्ट 
सोनमची ही पोस्ट तुफान व्हायरल होतेय. आपल्या पोस्टमध्ये सोनमने कंगनाच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. पण तिची ही पोस्ट कंगनासाठीच असल्याचे मानले जात आहे. कंगनाने बॉलिवूडमधील घराणेशाहीवर प्रहार करताना अनेक सेलिब्रिटींना फैलावर घेतले.  सोनम कपूरचाही त्यात समावेश आहे. सोनम कायम कंगनाच्या हिटलिस्टमध्ये राहिली आहे. आता सोनमने कंगनाला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर अनेकांनी सोनम कपूरलाही सोशल मीडियावर ट्रोलही केले होते. यावर सोनमने प्रतिक्रियाही दिली होती. एखाद्या फिल्म स्टारची मुलगी होणे ही माझ्यासाठी सन्मानाचा गोष्ट आहे आणि मला स्वत:च्या अस्तित्वावर अभिमान आहे, असे सोनमने म्हटले होते.

Web Title: sonam kapoor post no fight with pig target Kangana Ranaut's on her PoK remark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.