Siddharth Pithani says I was with Sushant Singh Rajput the night before his death | सुशांत मृत्यूच्या रात्री १ वाजता मित्र सिद्धार्थ पिठानीसोबत बोलला होता, हात धरून रडला आणि म्हणाला....

सुशांत मृत्यूच्या रात्री १ वाजता मित्र सिद्धार्थ पिठानीसोबत बोलला होता, हात धरून रडला आणि म्हणाला....

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येसंबंधी अजूनही नवनवीन माहिती समोर येत आहे. त्याचे फॅन्स अजूनही पूर्णपणे या धक्क्यातून बाहेर येऊ शकलेले नाहीत. सुशांत सिंह राजपूतने हे पाउल का उचललं? या प्रश्नाचं उत्तर सर्वांनाच हवं आहे. आता त्याच्याशी संबंधित वेगवेगळ्या लोकांची चौकशी सुरू आहे. त्यात त्याचा मित्र सिद्धार्थ पिठाणी याचंही नाव आहे. त्याने सुशांतबाबत काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्याने हेही सांगितले की, सुशांतला तो रात्री १ वाजता भेटला होता आणि सकाळी त्याने जीव दिला.

टाइम्स नाउला सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानीने सांगितले की, सुशांत फार वाईट स्थितीत होता. तो फार इमोशनल होता. जानेवारीमध्ये मी त्याच्या घरी गेलो होतो. कारण त्याने मला बोलवलं होतं. मी अहमदाबादमध्ये होतो. त्याने मला सोबत राहण्यासाठी बोलवलं होतं आणि म्हणाला होता की, जॉब सोडून परत ये, आपण सोबत काही करू. तेव्हा मी त्याच्यासोबत राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी आलो. ज्या दिवशी मी त्याला भेटतो त्याला फार लोक फील होत होतं. त्याने माझा हात पकडला आणि रडायला लागला होता.

सिद्धार्थने सांगितले की, सुशांतची तब्येत चांगली वाटत नव्हती आणि त्याचे हात थरथरत होते. तो दु:खी होऊन बोलत होता की, मला वाटतं माझं कुणीच नाही. सिद्धार्थने सांगितले की, तो सुशांतसोबत चंडीगढ ट्रीपवर गेला होता. त्यावेळी त्याच्या परिवाराला भेटलो होतो. त्यावेळी तो ठिक होता. ट्रिपवरून आल्यावर तो औषधे वेळेवर घेत होता. पण अचानक त्याने औषधे घेणं बंद केलं.

तर इंडिया टुडेच्या एका रिपोर्टमध्ये सिद्धार्थने १४ जूनआधी काय झालं होतं हे सांगितलं. सिद्धार्थने सांगितले की, तो लॉकडाऊन दरम्यान सुशांतसोबतच राहत होता. सुशांतच्या निधनाआधी उशीरा रात्री १ वाजता त्याला भेटायला गेला होता. सकाळी सुशांतने जीव दिला. सिद्धार्थने सांगितले की,  सुशांत त्याची एक्स मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूमुळे निराश होता. कारण अनेक रिपोर्ट्समध्ये त्याचं नाव येत होतं. 

दरम्यान, सिद्धार्थ पिठानीने सुशांतच्या परिवारावर आरोप लावला की, ते त्याच्यावर रिया विरोधात साक्ष देण्यासाठी दबाव टाकत आहेत. तर दुसरीकडे सुशांतच्या वडिलांच्या वकिलांचं म्हणनं आाहे की, सिद्धार्थ स्वत: २५ जुलैपर्यंत परिवाराला सांगत होता की, सुशांत केसमध्ये रिया कशाप्रकारे दोषी आहे.

हे पण वाचा :

अभिनेता कार्तिक आर्यनने शेअर केला 'दिल बेचारा'तील फेव्हरेट सीन, म्हणाला - दुसऱ्यांदा बघतोय!

VIDEO: 'सत्यमेव जयते', सुशांत आत्महत्या प्रकरणी रिया चक्रवर्तीने तोडली चुप्पी

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Siddharth Pithani says I was with Sushant Singh Rajput the night before his death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.