VIDEO: 'Satyamev Jayate', Riya Chakraborty breaks silence in Sushant suicide case | VIDEO: 'सत्यमेव जयते', सुशांत आत्महत्या प्रकरणी रिया चक्रवर्तीने तोडली चुप्पी

VIDEO: 'सत्यमेव जयते', सुशांत आत्महत्या प्रकरणी रिया चक्रवर्तीने तोडली चुप्पी

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला दीड महिना उलटलेला असतानाही अद्याप त्याच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकलेले नाही. त्यात सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीच्या विरोधात पटना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर एकानंतर एक मोठे खुलासे होताना दिसत आहे. दरम्यान या सगळ्यावर रियाने पहिल्यांदाच चुप्पी सोडली आहे.

रिया चक्रवर्ती म्हणाली, 'माझा देवावर आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. मला न्याय नक्कीच मिळेल. इलेक्ट्रॉनिक मीडियात माझ्याबद्दल अनेक विचित्र गोष्टी बोलल्या जात आहेत. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे मी त्यावर बोलणार नाही. सत्याचा विजय होईल. सत्यमेव जयते.' रियाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रिया चक्रवर्तीने तिच्या विरोधात पाटणामध्ये तक्रार दाखल केल्यानंतर आक्षेप घेतला आहे. ही तक्रार वैध नाही असे तिचे म्हणणे आहे. पाटण्याच्या राजीव नगर या परिसरात सुशांतच्या वडिलांचा प्रभाव आहे आणि बिहार पोलिसांकडून या प्रकरणाचा निष्पक्षापातीपणे तपास होणार नाही अशी याचिका रियाने सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे.

इतकेच नाही तर बिहार पोलिसांकडे या प्रकरणाचा तपास देणे योग्य नसून मुंबई पोलिसांनीच या प्रकरणाचा तपास करावा असाही उल्लेख या याचिकेत करण्यात आला आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: VIDEO: 'Satyamev Jayate', Riya Chakraborty breaks silence in Sushant suicide case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.