फक्त श्रेयस तळपदेच नाही तर 'या' कलाकारांनीही दिला 'पुष्पा'च्या हिंदी व्हर्जनला आपला आवाज!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 08:00 AM2022-01-22T08:00:00+5:302022-01-22T08:00:03+5:30

Pushpa Hindi Dubbed Artist: अल्लू अर्जुनच्या व्यक्तिरेखेला मराठमोठा अभिनेता श्रेयस तळपदेने आवाज दिला आहे. रश्मिका मंदानाला कोणी आवाज दिला माहितीये का?

Shreyas Talpade dubbed Hindi version of Allu Arjun's Pushpa know about other star casts voice behind | फक्त श्रेयस तळपदेच नाही तर 'या' कलाकारांनीही दिला 'पुष्पा'च्या हिंदी व्हर्जनला आपला आवाज!

फक्त श्रेयस तळपदेच नाही तर 'या' कलाकारांनीही दिला 'पुष्पा'च्या हिंदी व्हर्जनला आपला आवाज!

Next

Pushpa Hindi Dubbed Artist: साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन ( Allu Arjun) व रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna ) यांच्या ‘पुष्पा’  (Pushpa) या सिनेमाची जोरदार हवा आहे. अगदी हिंदी भाषिक प्रेक्षकांनीही हा सिनेमा डोक्यावर घेतला. हिंदी डब सिनेमावरही प्रेक्षकांच्या उड्या पडल्या. हिंदीतील ‘पुष्पा’ला अनेक कलाकारांनी आपला आवाज दिला आहे. हिंदीत प्रदर्शित झालेल्या या सिनेमातील नायकाला म्हणजेच अल्लू अर्जुनच्या व्यक्तिरेखेला तुमचा आमचा आवडता मराठमोठा अभिनेता श्रेयस तळपदेने आवाज दिला आहे. आता अन्य व्यक्तिरेखांना कोणी कोणी आवाज दिला, हे जाणून घ्यायलाही तुम्ही उत्सुक असाल तर आज आम्ही तुम्हाला याबद्दलच सांगणार आहोत.

अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदाना या चित्रपटात लीड रोलमध्ये आहे. तिने या चित्रपटात श्रीवल्लीची भूमिका साकारली आहे. तिच्या या पात्राला व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट स्मिता रोजेमेयर हिने आवाज दिला आहे.

‘पुष्पा’ पाहिला असेल तर या चित्रपटात अल्लू अर्जुनच्या मित्राची भूमिका साकारणाऱ्या तेलगू अभिनेत्याला बॉलिवूड अभिनेता साहिल वैद्य याने आपला आवाज दिला आहे. साहिल अलीकडे ‘शेरशाह’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याने सिद्धार्थ मल्होत्राच्या मित्राची भूमिका साकारली होती.

‘पुष्पा’ मध्ये आयपीएस अधिकारी भैरोसिंह शेखावतची भूमिका साकारणारा अभिनेता फहाद फासिल याला हिंदीत कोणी आवाज दिलाये माहितीये? तर अभिनेता राजेश खट्टर यांनी.

तेलगू अभिनेता धनंजय याने पुष्पा या चित्रपटात जॉली रेड्डी हे पात्र साकारलं आहे. हिंदीत या पात्राला मनोज पांडे यांनी आवाज दिला आहे.

श्रीनुची पत्नी दक्षायणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अनुसुया भारद्वाज हिला सबीना मौसम हिने आपला आवाज दिला आहे. 

कोंडा रेड्डीची भूमिका साकारणाऱ्या अजय शाह या अभिनेत्याला राजेश जॉली यांनी आपला आवाज दिला आहे. मंगलम श्रीनूची भूमिका साकारणारा अभिनेता सुनीलला व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट उदय सबनिस यांनी आवाज दिला आहे.

Web Title: Shreyas Talpade dubbed Hindi version of Allu Arjun's Pushpa know about other star casts voice behind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app