Shocking! सुशांतच्या मृत्यूनंतर सोनू निगमने केला मोठा खुलासा, म्युझिक इंडस्ट्रीतील सांगितले वास्तव
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 13:18 IST2020-06-19T13:17:57+5:302020-06-19T13:18:29+5:30
सुशांत सिंग राजपूतने म्युझिक इंडस्ट्रीतील धक्कादायक वास्तव सांगितले आहे. यासोबतच त्याने अप्रत्यक्षपणे सलमान खानवर निशाणा साधला आहे.

Shocking! सुशांतच्या मृत्यूनंतर सोनू निगमने केला मोठा खुलासा, म्युझिक इंडस्ट्रीतील सांगितले वास्तव
बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगमने त्याच्या नवीन व्लॉगमध्ये बरेच धक्कादायक खुलासे केले आहेत. ज्याच्याबद्दल सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. सोनू निगमने आपल्या व्लॉगमध्ये स्पष्ट सांगितले आहे की आज तुम्ही सुशांत सिंग राजपूतचे नाव ऐकत आहात पण कोणतातरी संगीतकार किंवा म्युझिक कंपोझरदेखील आत्महत्या करू शकतो.
सोनू निगमने सांगितले की म्युझिकमध्ये देखील खूप मोठे माफिया बसलेले आहेत आणि मोजून दोन मोठ्या म्युझिक कंपनी आहेत जे निश्चित करतात की कोणता सिंगर गाणार आणि कोण नाही.
सोनू निगम अप्रत्यक्षपणे सलमान खानबद्दलही खूप काही म्हणाला. त्याने सांगितले की, माझ्यासोबतही असे झाले असते की माझी गाणी जी मी गातो आहे आणि कुणीतरी बोलेल की..तोच अभिनेता ज्यावर आजकल खूप बोट उचलले जात आहे. तो अभिनेता सांगतो आहे की याच्याकडून गाणी गाऊन नका घेऊ.
सोनू निगमने हेही सांगितले की, त्याने हे अरजित सिंगसोबतही केले आहे. सोनूने विचारले की, हे काय आहे? तुम्ही तुमच्या पॉवरचा वापर याप्रकारे कसे काय करू शकता? आप अपनी पावर का इस तरह से इस्तेमाल कैसे कर सकते हैं? मी गायलेली कित्येक गाणी डब झाली आहेत. हे खूप लज्जास्पद आहे. मी कुणाकडे काम मागत नाही. पण मला बोलवून माझ्याकडून गाणे गाऊन घेऊन मग त्याला डब करतात.