Shilpa Shetty: राज कुंद्राला पोलीस घरी घेऊन आलेले; शिल्पा शेट्टीला लागून राहिलेली 'हंगामा 2'ची चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 10:20 PM2021-07-23T22:20:41+5:302021-07-23T22:23:06+5:30

Raj kundra Porn movie Case: पॉर्नोग्राफी प्रकरणात शुक्रवारी सकाळपासून अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरात गुन्हे शाखेकड़ून झाडाझडती सुरु होती. यातच शुक्रवारी गुन्हे शाखेकड़ून तिचा जबाब नोंदविण्यात आला आहे.

Shilpa Shetty appeals to fans watch Hungama 2 with family when police, Raj kundra came home | Shilpa Shetty: राज कुंद्राला पोलीस घरी घेऊन आलेले; शिल्पा शेट्टीला लागून राहिलेली 'हंगामा 2'ची चिंता

Shilpa Shetty: राज कुंद्राला पोलीस घरी घेऊन आलेले; शिल्पा शेट्टीला लागून राहिलेली 'हंगामा 2'ची चिंता

Next

shilpa shetty Hungama 2 movie: बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या (shilpa shetty) नवऱ्याला म्हणजेच उद्येगपती राज कुंद्राला (Raj Kundra) पॉर्न फिल्म (Porn Film) बिनविणे आणि ते ऑनलाईन विकणे आदी गंभीर गुन्ह्यांमध्ये अटक झाली आहे. त्याचे दररोज नवनवीन खुलासे होत असताना आज दिवसभर शिल्पा शेट्टीचीदेखील गुन्हे शाखेने कसून चौकशी केली आहे. अशातच घरात एवढा गोंधळ सुरु असताना शिल्पा शेट्टीला तिच्या आज रिलिज झालेल्या 'हंगामा 2' या (Hungama 2) सिनेमाची चिंता सतावत असल्याचे दिसून आले आहे. अभिनेत्रीने तसे ट्विटही केले आहे. (Shilpa Shetty request Fans to Watch her watch Hungama 2 with your families on Raj Kundra's Porn film Row.)

शिल्पा शेट्टीच्या बँक खात्याचीही होणार चौकशी; पोलिसांनी नोंदवला जबाब

राज कुंद्रा कोणत्याही प्रकरणात अडकला की त्याचा फायदा थेट शिल्पा शेट्टीला होतो, असे अनेकदा दिसून आले आहे. शिल्पा शेट्टीची भूमिका असणारा हंगामा 2 हा चित्रपट आज हॉटस्टारवर रिलीज झाला आहे. यावर शिल्पाने केलेले ट्विट कमालीचे चर्चेत आहे. (Hungama 2 movie released Today on Disney Hotstar.)
शिल्पा शेट्टीने आपल्या चाहत्यांना तिचा हंगामा 2 हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे. ''तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे की तुम्ही सिनेमाशी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी तुमच्या कुटुंबासह हंगामा २ जरूर पहा. कारण तुमच्या चेहऱ्यावर हसू येईल'', असे शिल्पाने ट्विट केले आहे. महत्वाचे म्हणजे हे ट्विट जेव्हा शिल्पाने केले तेव्हा तिच्या घरी पती राज कुंद्राला घेऊन पोलीस पोहोचले होते. यावेळी शिल्पा शेट्टीची देखील चौकशी करण्यात आली. तिचे जबाब नोंदविण्यात आले. 

शिल्पाने पुढे ट्विट करत म्हटले. मी योगाच्या शिक्षणावर विश्वास ठेवते आणि सराव करते. आयुष्य हे केवळ उपलब्ध क्षणांसाठी आहे. हंगामा 2 च्या संपूर्ण टीमने कठोर मेहनत घेतली आहे. हा सिनेमा वाया जाता नये, असे शिल्पाने म्हटले आहे. 

दिवसभर झाडाझडती...
पॉर्नोग्राफी प्रकरणात शुक्रवारी सकाळपासून अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरात गुन्हे शाखेकड़ून झाडाझडती सुरु होती. यातच शुक्रवारी गुन्हे शाखेकड़ून तिचा जबाब नोंदविण्यात आला आहे. या वृत्ताला गुन्हे शाखेचे सह आयुक्त मिलिंद भारांबे यांनी दुजोरा दिला आहे. तसेच तिच्या बँक खात्याचीही लवकरच चौकशी होणार असल्याचेही समजते आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणातील एका कंपनीत शिल्पा शेट्टीचीही भागीदारी होती. मात्र २०२० मध्ये तिने या पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली आहे. याबाबत गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे. तसेच या कंपनीतून आता पर्यंत कीती जणांनी आणि कुठल्या कारणांमुळे राजीनामा दिला याबाबत संबंधितांकडे चौकशी करत जबाब नोंदविण्यात येत आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shilpa Shetty appeals to fans watch Hungama 2 with family when police, Raj kundra came home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app