भाई ऐसा मत करो, NCB आ जाएगी...! शाहिद कपूरने व्हिडीओ पाहून फॅन्स झाले अवाक्

By रूपाली मुधोळकर | Updated: October 12, 2020 15:29 IST2020-10-12T15:26:21+5:302020-10-12T15:29:23+5:30

शाहिदचा हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

shahid kapoor shows funny condition in video fans says dont do this ncb will come |  भाई ऐसा मत करो, NCB आ जाएगी...! शाहिद कपूरने व्हिडीओ पाहून फॅन्स झाले अवाक्

 भाई ऐसा मत करो, NCB आ जाएगी...! शाहिद कपूरने व्हिडीओ पाहून फॅन्स झाले अवाक्

ठळक मुद्दे3 तासांत 23 लाखांवर लोकांनी शाहिदचा हा व्हिडीओ पाहिला आहे आणि यावरच्या कमेंट्स भन्नाट आहेत.

शाहिद कपूर सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. सध्या शाहिद ‘जर्सी’ या आगामी सिनेमाच्या तयारीत बिझी आहे. पण म्हणून सोशल मीडियावरचा त्याचा वावर कमी झालेला नाही. तूर्तास शाहिदचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. का तर शाहिदने या व्हिडीओत दिलेले एक्सप्रेशन्स. होय, शाहिदचा हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. त्याच्या या व्हिडीओवर चाहते एकापेक्षा एक भारी कमेंट देत आहेत.

व्हिडीओत शाहिद कारमध्ये गाणे ऐकताना दिसतोय.   पण यावेळी तो काही विचित्र हावभाव करताना दिसतो. व्हिडीओ शेअर करताना त्याने ‘मूड’ असे कॅप्शन दिले आहे. या मुडीबाबाचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स केल्यात.

भाई ये क्या हो गया आपको? असा सवाल एका चाहत्याने हा व्हिडीओ पाहिल्यानंतर केला. तर एकाने शाहिदला चक्क एनसीबीची आठवण करून दिली. भाई ऐसा मत करो, वरना एनसीबी आ जाऐगी, बेटर टेक केअर, असे या चाहत्याने लिहिले. 3 तासांत 23 लाखांवर लोकांनी शाहिदचा हा व्हिडीओ पाहिला आहे आणि यावरच्या कमेंट्स भन्नाट आहेत.

शाहिदने 2 अटींवर साईन केला होता जर्सी
कोरोना काळात फिल्ममेकर्सचे शूटिंग बंद पडल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अनलॉकच्या प्रकियेनुसार कोविडमुळे सुरक्षिततेचे नियम पाळण्यासाठी आणि सेटवर त्यासंबंधित इतर गोष्टींची काळजी घेण्यासाठी खर्च वाढला आहे. त्यामुळे शाहिद कपूरने आपल्या मानधनात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, शाहिदने दोन अटींवर जर्सी सिनेमा साईन केला होता. ज्यातील पहिला अट म्हणजे,शाहिदने यासिनेमासाठी 33 कोटींचे मानधन मागितले होतेआणि दुसरे सिनेमाचे प्रॉफिट शेअर मागितले होते. शाहिदच्या या मागण्या मान्य करुन मेकर्सनी सिनेमाचे शूटिंग देखील सुरु केले होते. त्यानंतर कोरोनामुळे सगळी परिस्थिती बदलली आणि मेकर्सना कलाकारांनी आपल्या मानधनात कपात करण्यास सांगावे  लागले. 

 मानधनात केली कपात
मिळालेल्या माहितीनुसार शाहिद कपूरने मेकर्सची झालेली आर्थिक अडचण लक्षात घेत आपल्या मानधनातून 8 कोटी कमी केले आहेत. शाहिद आता ‘जर्सी’ साठी25 कोटींचे मानधन घेणार आहे. प्रॉफीट शेअरची अट अजूनही कायम आहे.  गौतम तिन्ननुरी यांच्या दिग्दर्शनात तयार होत असलेल्या या सिनेमात शाहिदसोबत मृणाल ठाकूर आणि पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘जर्सी’ या तेलुगू चित्रपटातील मुख्य पात्राचे नाव अर्जुन होते. ही भूमिका दाक्षिणात्य अभिनेता नानीने केली होती. भारतीय क्रिकेट संघात सहभागी होण्यासाठी अर्जुनचा संघर्ष या चित्रपटात दाखवण्यात आला होता. आता हिंदीत हा संघर्ष पाहायला मिळणार आहे. 

शाहिद कपूरला पसंत नव्हती करिना कपूरसोबत त्याची जोडी, ब्रेकअपनंतर केला धक्कादायक खुलासा

का झाले शाहिद कपूरशी ब्रेकअप? 13 वर्षानंतर करिना कपूरने केला धक्कादायक खुलासा

Web Title: shahid kapoor shows funny condition in video fans says dont do this ncb will come