ठळक मुद्दे2007 मध्ये ‘जब वी मेट’ रिलीज झाला होता. पण या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान करिना आणि शाहिद यांच्या नात्यात कुरबुरी सुरु झाल्या होत्या.

सैफ अली खानशी लग्न करण्याआधी करिना कपूरशाहिद कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. करिना व शाहिदच्या लव्हलाईफची त्याकाळी भलतीच चर्चा होती. एकत्र काम करता करता दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. पण अचानक दोघांत ब्रेकअप झाले. यानंतर करिनाने सैफ अली सोबत लग्न केले आणि शाहिद कपूरने मीरा राजपूतसोबत संसार थाटला. आता हे सगळे सांगण्याचे कारण म्हणजे, बेबो अर्थात करिना कपूरने केलेला खुलासा. होय, शाहिदशी करिनाचे ब्रेकअप होऊन आता 13 वर्षांपेक्षा अधिक काळ झाला. पण आता इतक्या वर्षांनंतर या ब्रेकअपबद्दल बेबोने एक धक्कादायक खुलासा केला.


 
इम्तियाज अलीच्या ‘जब वी मेट’ या सिनेमात करिना व शाहिदने एकत्र काम केले होते. याच चित्रपटाच्या सेटवरून दोघांत ब्रेकअप झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. पुढे या बातम्या ख-या ठरल्या. पण हे ब्रेकअप का झाले? हे अद्याप कुणालाही ठाऊक नव्हते. पण नुकत्याच अनुपमा चोप्राला दिलेल्या एका मुलाखतीत करिनाने या ब्रेकअपच्या कारणांचा खुलासा केला.

ती म्हणाली, ‘ नशिबाचे स्वत:चे काही वेगळे प्लान असतात आणि आयुष्यात अनेक गोष्टी घडत जातात.  ‘जब वी मेट’ आणि ‘टशन’दरम्यान अशा काही गोष्टी घडल्या की  माझे आणि शाहिदचे मार्ग बदलले. त्यावेळी माझ्या आणि ‘गीत’च्या (‘जब वी मेट’मध्ये गीत नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती.) आयुष्यात घडत असलेल्या अनेक गोष्टी सारख्या होत्या. त्यावेळी खासगी आणि प्रोफेशनल लाइफ दोन्ही सांभाळणे कठीण झाले होते. ‘जब वी मेट’च्या सेकंड हाफमध्ये ज्याप्रमाणे गीतचे आयुष्य बदलते त्याप्रमाणे माझेही आयुष्य बदलले.
ती पुढे म्हणाली,‘जब वी मेट’ आणि ‘टशन’ हे माझ्या आयुष्यातील सर्वात खास सिनेमे आहे. ‘जब वी मेट’ने माझे आयुष्य बदलले तर  ‘टशन’ सिनेमाच्या सेटवर मला सैफ भेटला. 


 

2007 मध्ये ‘जब वी मेट’ रिलीज झाला होता. पण या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान करिना आणि शाहिद यांच्या नात्यात कुरबुरी सुरु झाल्या होत्या. या सिनेमानंतर करिनाने ‘टशन’मध्ये काम केले. यात सैफ आणि अक्षय कुमार यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. यानंतर सैफ-करिनाने एकमेकांना डेट करायला सुरूवात केली आणि 2012 मध्ये या दोघांनी लग्न केले. तर 2015 मध्ये शाहिदने मीरा राजपूतशी लग्न केले.

Read in English

Web Title: kareena kapoor khan talk about her breakup with shahid kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.