shahid kapoor film kabir singh hilarious memes viral | ‘कबीर सिंग’च्या डायलाॅगवर ‘इलेक्शन कॉमेडी’, Viral Memes वाचून व्हाल लोटपोट
‘कबीर सिंग’च्या डायलाॅगवर ‘इलेक्शन कॉमेडी’, Viral Memes वाचून व्हाल लोटपोट

ठळक मुद्दे‘कबीर सिंग’ हा चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’ या तेलगू सिनेमाचा हा अधिकृत हिंदी रिमेक आहे.

शाहिद कपूर स्टारर ‘कबीर सिंग’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि  ट्रेंड करू लागला. सोशल मीडियावर या ट्रेलरला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळतोय. याचदरम्यान शाहिद कपूर आणि कियारा अडवाणीच्या या चित्रपटावर अनेक मीम्सही व्हायरल होत आहे. 
‘नहीं आऊंगा मतलब नहीं आऊंगा, बोला ना नहीं आऊंगा,’असा एक डायलॉग चित्रपटात आहेत. या डॉयलॉगवर भन्नाट मीम्स बनलेले पाहायला मिळताहेत. याशिवाय अनेक युजर्सनी ‘कबीर सिंग’च्या मीम्सचा संबंध लोकसभा निवडणूक आणि शिक्षण प्रणालीशी जोडला आहे.

शाहिद कपूरचा चित्रपटातील रफ लूक, त्याचे अ‍ॅग्रेसिव्हनेस शिवाय ड्रग अ‍ॅडिक्ट सीन्सवरूनही अनेक मीम्स व्हायरल झाले आहेत. एका युजरने तर शाहिदच्या प्रेमातील समर्पणवृत्तीचा संबंध रणवीर सिंग आणि रणबीर कपूरच्या अ‍ॅक्टिंगशी जोडला आहे. 
शाहिदने या चित्रपटात अतिशय शीघ्रकोपी, तापट तरूणाची भूमिका साकारली आहे. याऊलट कियारा अडवाणी एका साध्यासरळ मुलीच्या भूमिकेत आहे.
‘कबीर सिंग’मधील भूमिकेने शाहिदला कमालीचे प्रभावित केले होते. खुद्द शाहिदने एका मुलाखतीत याबद्दल सांगितले होते. कथेच्या मागणीनुसार, शूटींगवेळी शाहिद रोज २० सिगरेट ओढायचा. यामुळे त्याच्या संपूर्ण शरीरभर सिगरेटचा वास यायचा. त्यामुळे मुलांजवळ जाण्याआधी शाहिद  दोन तास आंघोळ करायचा.
‘कबीर सिंग’ हा चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’ या तेलगू सिनेमाचा हा अधिकृत हिंदी रिमेक आहे. विजय देवरकोंडा स्टारर ‘अर्जुन रेड्डी’ हा सिनेमा सुपरहिट झाला आणि आता हाच सिनेमा ‘कबीर सिंग’ नावाने प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.  संदीप वंगा दिग्दर्शित या सिनेमात कबीर सिंगची कथा पाहायला मिळणार आहे. मेडिकलचा विद्यार्थी असलेला हा कबीर सिंग  त्याची ज्युनिअर  (किआरा अडवानी) हिच्या प्रेमात पडतो. स्वभावाने अतिशय  रागीट, शीर्घकोपी असलेल्या या कबीरचा पुढे प्रेमभंग होतो आणि तो  दारुच्या आहारी जातो. अशी ही ढोबळ कथा आहे.   येत्या २१ जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. त्यापूर्वी या चित्रपटावरचे भन्नाट मीम्स तुम्ही पाहायलाच हवेत. 


Web Title: shahid kapoor film kabir singh hilarious memes viral
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.