ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या गाडीला अपघात झाला आहे. खालापूर टोलनाक्याजवळ हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. शबाना आझमी यांना प्राथमिक उपचारासाठी पनवेलमधील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात घडला तेव्हा त्यांच्यसोबत गाडीमध्ये जावेद अख्तरदेखील गाडीत होते.  मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर कार आणि ट्रक यांच्यात धडक झाली. सध्या, जखमी शबाना यांना कळंबोलीतील एमजीएम येथून मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात शिफ्ट करण्यात आले आहे. 

जखमी शबाना आझमी यांना मुंबईमधील धीरुभाई अंबानी रुग्णालयाता हलविण्यात आले आहे. मणक्याला मार लागल्याने पुढील उपचार येथील रुग्णालयात होणार आहेत.

सुदैवाने या अपघतात जावेद अख्तर यांना फारशी दुखापत झालेली नाही.

 फोटो पाहून या अपघाताची तीव्रता आपल्या लक्षात येते आहे. शबाना आझामी यांच्या डोळ्याला दुखापत झाल्याचे या फोटोमध्ये दिसतेय. तसेच मानेला दुखापत झाल्याची माहिती आहे. जखमी शबाना आझमी यांना कळंबोली एमजीएम येथून धीरूभाई अंबानी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

 

Read in English

Web Title: Shabana Azmi's car accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.