Shabana Azmi's Health : शबाना आझमी यांच्या तब्येतीत सुधारणा, पण कधी मिळणार डिस्चार्ज...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 18:11 IST2020-01-22T18:05:59+5:302020-01-22T18:11:33+5:30
Shabana Azmi's Health : ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी गेल्या शनिवारी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ हा अपघात घडला होता.

Shabana Azmi's Health : शबाना आझमी यांच्या तब्येतीत सुधारणा, पण कधी मिळणार डिस्चार्ज...
ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी गेल्या शनिवारी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ हा अपघात घडला होता. या अपघातात त्यांच्या कारचा चालक आणि त्यांना दुखापत झाल्यानंतर उपचारासाठी त्यांना कोकिलाबेन धीरुभाई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. इंडिया टीव्हीच्या रिपोर्टनुसार शबाना आझमी यांना लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार आहे. जावेद अख्तर यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये ते म्हणाले शबाना आझमी यांचे सर्व रिपोर्ट्स पॉझिटीव्ह आले आहे. त्यांना गंभीर दुखापत झालेली नाही..
शबाना आझमींचे पती जावेद अख्तर अपघातग्रस्त कारमध्ये नव्हते. ते दुसऱ्या कारमधून प्रवास करत होते. जावेद अख्तर यांची कार शबाना यांच्या कारच्या मागे होती. या अपघातात शबाना यांच्या नाकाला आणि डोक्याला दुखापत झाली होती. ते सगळं खंडाळ्यातल्या घरी वीकेंडसाठी जात असताना हा अपघात झाला. शबाना आझमी यांच्या ड्रायव्हरवर रॅश ड्रायव्हिंगची केस दाखल करण्यात आली आहे. शबाना यांचा ड्रायव्हर अतिवेगाने गाडी चालवत होता. त्याने ट्रकला धडक दिली. त्याच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप ट्रक ड्रायव्हरने केला होता. शबाना आझमी यांची रुग्णालयात येऊन बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रेटींना आतापर्यंत भेट घेतली आहे.