१-२ कोटी नव्हे तर समांथाने 'पुष्पा'तील एका गाण्यासाठी चक्क इतकं घेतलं मानधन, आकडा वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 04:35 PM2022-01-17T16:35:33+5:302022-01-17T16:38:48+5:30

समांथाचा बोल्ड अंदाज आणि तिच्या डान्स मुव्ह्सने हे गाणं अफलातून हिट झालं. या सिनेमात ती केवळ या गाण्यात दिसली. पण तिने या एका गाण्यासाठी सिनेमाच्या बरोबरीची फी घेतली.

Samantha Ruth Prabhu charge for oo antava song in Allu Arjun film Pushpa | १-२ कोटी नव्हे तर समांथाने 'पुष्पा'तील एका गाण्यासाठी चक्क इतकं घेतलं मानधन, आकडा वाचून व्हाल अवाक्

१-२ कोटी नव्हे तर समांथाने 'पुष्पा'तील एका गाण्यासाठी चक्क इतकं घेतलं मानधन, आकडा वाचून व्हाल अवाक्

Next

साऊथचा सुपरहिट सिनेमा 'पुष्पा'मधील (Pushpa) अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदानाच्या (Rashmika Mandana) अभिनयासोबतच या सिनेमातील गाण्यांची चांगलीच चर्चा रंगली आहे. यातील एका गाण्याने तर रेकॉर्ड कायम केला आहे. ते गाणं म्हणजे समांथा रूथ प्रभुचा (Samantha Ruth Prabhu) आयटम नंबर 'ओ अंतवा' (Oo antava song). समांथाचा बोल्ड अंदाज आणि तिच्या डान्स मुव्ह्सने हे गाणं अफलातून हिट झालं. या सिनेमात ती केवळ या गाण्यात दिसली. पण तिने या एका गाण्यासाठी सिनेमाच्या बरोबरीची फी घेतली.

एका न्यूज पोर्टलच्या वृत्तानुसार, समांथाने 'पुष्पा'तील 'ओ अंतवा' गाण्यासाठी पाच कोटी रूपये मानधन घेतलं. पोर्टलने सूत्रांच्या हवाल्याने सांगितलं की, समांथा हे गाणं करण्यासाठी अजिबात तयार नव्हती. सूत्राने सांगितलं की, 'तिने ओ अंतवा डान्स नंबर करण्यासाठी मोठी रक्कम घेतली. तिला हे गाणं करायचं नव्हतं. मग सिनेमाचा मुख्य हिरो अल्लू अर्जुनने पर्सनली तिला या गाण्यासाठी तयार केलं'. 

काही इतर रिपोर्ट्सनुसार, समांथाला सिनेमाचे दिग्दर्शक सुकुमार यांनी एक उदाहरण देऊन तयार केलं होतं. सुकुमारने तिला पूजा हेगडेचा डान्स नंबर 'रंगस्थलम' दाखवला. ज्यानंतर समांथा तयार झाली. समांथाने हे गाणं करण्याच्या अनुभवाबाबत सांगितलं होतं की, 'स्टेप्स, बीट्स आणि अल्लू अर्जुनसोबत परफेक्ट डान्स करणं फार चॅलेंजिंग होतं, फार थकवा आणणारं होतं'.

सिनेमाच्या रिलीजपासून समांथाचं हे गाणं ट्रेंड करत आहे. सोशल मीडियावर लोक या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. समांथाने तिच्या डान्स प्रॅक्टिसचा एक BTS व्हिडीओही शेअर केला होता. ज्यात ती फारच मेहनत घेऊन रिहर्सल करताना दिसली होती.
 

Web Title: Samantha Ruth Prabhu charge for oo antava song in Allu Arjun film Pushpa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app