बॉलिवूडचा दबंग खान सलमान लवकरच 'दबंग ३' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या तो या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर लगेचच सलमाननं त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगची घोषणा केली आहे. 

पुढील वर्षी म्हणजेच २०२०मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणारा चित्रपट 'राधे'च्या शूटिंगला सलमानने कालपासून सुरूवात केली आहे. ही माहिती त्यानेच त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन दिली. 


'राधे' चित्रपटातील स्टार कास्टसोबतचा फोटो शेअर करत सलमाननं म्हटलं की, ‘आणि प्रवासाला सुरुवात झाली, राधे ईद 2020’ सलमाननं शेअर केलेल्या या फोटोमध्ये प्रभुदेवा, रणदीप हुड्डा, श्रॉफ, खान, पाटनी आणि निर्माता अतुल अग्निहोत्री दिसत आहेत.


या चित्रपटात सलमान नेहमीपेक्षा वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं सलमान खान आणि प्रभूदेवा ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येत आहे. तर भारत सिनेमात सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसलेली दिशा पटानी या चित्रपटात सलमानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तसेच अभिनेता जॅकी श्रॉफ यांचीही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. सलमान खान फिल्मच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती सोहेल खान आणि रील लाइफ प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड करत आहे.


सलमानचा ‘दबंग 3’ येत्या 20 डिसेंबरला रिलीज होत आहे. सलमान दरवर्षी ईदच्या दिवशी त्याचा सिनेमा रिलीज करतो. खरं तर या सिनेमाच्या ऐवजी पुढच्या वर्षी सलमानचा संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘इन्शाअल्लाह’ रिलीज होणार होता. या सिनेमा अलिया भटसोबत तो स्क्रीन शेअर करणार होता मात्र काही कारणानं हा सिनेमा शूट सुरू होण्याआधीच थांबलं. त्यामुळे आता पुढच्या वर्षी ईदच्या दिवशी सलमानचा 'राधे' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Salman Khan romance with Disha Patani, They will be seen together in Radhe Movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.