Salman Khan VIDEO: सलमानची पार्टी आणि चर्चा एक्स गर्लफ्रेंडची, 'मिठी अन् कपाळावर Kiss'; व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 12:53 PM2022-12-27T12:53:52+5:302022-12-27T12:55:35+5:30

बॉलिवुडचा दबंग सलमान खान आज ५७ वर्षांचा झाला आहे. सलमानच्या पार्टीत चाहत्यांच्या नजरेत आलेली एक गोष्ट ती म्हणजे सलमान आणि एक्स गर्लफ्रेंडची भेट.

salman-khan-kissed-ex-girlfriend-sangeeta-bijlani-after-birthday-party-video-went-viral | Salman Khan VIDEO: सलमानची पार्टी आणि चर्चा एक्स गर्लफ्रेंडची, 'मिठी अन् कपाळावर Kiss'; व्हिडिओ व्हायरल

Salman Khan VIDEO: सलमानची पार्टी आणि चर्चा एक्स गर्लफ्रेंडची, 'मिठी अन् कपाळावर Kiss'; व्हिडिओ व्हायरल

googlenewsNext

Salman Khan VIDEO:  बॉलिवुडचा दबंग सलमान खान आज ५७ वर्षांचा झाला आहे. यानिमित्त काल रात्री अनेक कलाकार सलमानच्या बांद्रा येथील घरी त्याला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले. पार्टीत करण-अर्जुनची गळाभेट तर चर्चेचा विषय होती.  मात्र आणखी एक गोष्ट चाहत्यांच्या नजरेत आली ती म्हणजे सलमान आणि एक्स गर्लफ्रेंडची भेट.

सलमानच्या गाजलेल्या प्रेमप्रकरणांपैकी एक म्हणजे संगीता बिजलानी (Sangeeta Bijlani) सोबतचे त्याचे प्रेमप्रकरण. एक काळ असा होता की जेव्हा सलमान आणि संगीता बिजलानीचे लग्नही ठरले होते. पत्रिकाही छापल्या गेल्या होत्या, मात्र काही कारणाने हे लग्न मोडले. कालच्या सलमानच्या पार्टीत हायलाईट होती ती सलमान आणि संगीताची भेट.

संगीताला केले किस...

पार्टी संपल्यावर सलमान संगीताला बाहेर सोडायला आला. तेव्हा सलमानने संगिताला मिठी मारली  आणि तिच्या कपाळावर किस केले. हे बघून अनेकांच्या भुवया उंचावल्या. पार्टीतल्या या व्हिडिओची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. कितीतरी वेळ ते गाडीजवळ उभे होते. त्यांच्यात अजुनही खास मैत्री आहे हेच यातून निदर्शनास आले. सलमान खान मैत्री जपण्यासाठी आणि एक सच्चा मित्र म्हणून ओळखला जातो. त्याचे एक्सगर्लफ्रेंड्स सोबतही अजून मैत्रीपूर्ण संबंध आहेत.

Happy Birthday Salman Khan : भाईजानचा वाढदिवस; पठाण सोबतच्या 'स्पेशल बॉंंड' ने वेधले लक्ष

सलमान खान लवकरच बहुप्रतिक्षित 'टायगर ३'(Tiger 3) चित्रपटात दिसणार आहे. तर त्याने शाहरुखच्या 'पठाण' (Pathaan) सिनेमात कॅमिओही केला आहे. याशिवाय यावर्षी त्याचा 'किसी का भाई किसी की जान' (Kisi ka bhai kisi ki jaan) हा सिनेमाही प्रदर्शित होणार आहे.

Web Title: salman-khan-kissed-ex-girlfriend-sangeeta-bijlani-after-birthday-party-video-went-viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.