ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर हे गाव दत्तक घेण्याचा सलमानने निर्णय घेतला असून या गावाची संपूर्ण जबाबदारी त्याने स्वीकारली आहे.

बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान नेहमी सगळ्यांच्या मदतीला धावून येत असतो. मग, तो सामान्य व्यक्ती असो किंवा दिग्गज कलाकार वा सहकलाकार... सलमानच्या या स्वभावावर त्याचे चाहते प्रचंड फिदा आहेत. आता पुन्हा एकदा सलमानने एक खूप चांगले काम केले आहे. तो कोल्हापूरवासियांच्या मदतीसाठी धावून आला आहे.

कोल्हापूरमध्ये काही महिन्यांपूर्वी पुराने थैमान माजले होते. अनेक गावं पाण्याखाली गेली होती. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले होते. या गोष्टीला आज अनेक महिने झाले असले तरी देखील काही गावांमध्ये आजही अनेक वाईट परिस्थिती आहे. कोल्हापूरमधील एका गावाचा आता कायापालट करण्याचे सलमान खानने ठरवले आहे. त्याने कोल्हापूरमधील एक गाव दत्तक घेतले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर हे गाव दत्तक घेण्याचा सलमानने निर्णय घेतला असून या गावाची संपूर्ण जबाबदारी त्याने स्वीकारली आहे. ऐलान फाऊंडेशन आणि सलमान खान मिळून या गावाची मदत करण्याची ठरवली आहे.

कोल्हापूरमध्ये पूर आल्यानंतर सोशल मीडियाद्वारे त्याने पूरग्रस्त पीडितांविषयी दुःख व्यक्त केले होते. सलमानने कोल्हापूरवासियांना केलेल्या या मदतीची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

सलमानचा दबंग ३ हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर सलमान आता राधे : इंडियाज मोस्ट वॉण्टेड या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटाला ब्लॉकबस्टर बनवण्यासाठी सलमान खान आणि दिग्दर्शक प्रभूदेवा यांनी जोर लावला आहे. राधे चित्रपटाबाबत सलमान खानचे चाहते खूप उत्सुक आहेत. या चित्रपटात सलमानसोबत दिशा पटानी मुख्य भूमिकेत असून या चित्रपटात सलमान एका हटके भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे. हा चित्रपट ईदच्या दिवशी म्हणजेच 22 मे ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता जॅकी श्रॉफ देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. सलमान खान फिल्मच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती सोहेल खान आणि रील लाइफ प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड करत आहे.


 

Web Title: salman khan helps flood affected village in kolhapur PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.