एका सिनेमासाठी सलमानने तोडला त्याचा इतक्या वर्षाचा नियम, राधेचा ट्रेलर पाहून येईल तुमच्या लक्षात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 05:01 PM2021-04-22T17:01:54+5:302021-04-22T17:09:53+5:30

Radhey Movei : ट्रेलरमध्ये जॅकलिन फर्नांडिसचा डान्स नंबरही पाहायला मिळतोय.

Salman khan fans reaction on disha salman kissing seen in radhe trailer | एका सिनेमासाठी सलमानने तोडला त्याचा इतक्या वर्षाचा नियम, राधेचा ट्रेलर पाहून येईल तुमच्या लक्षात

एका सिनेमासाठी सलमानने तोडला त्याचा इतक्या वर्षाचा नियम, राधेचा ट्रेलर पाहून येईल तुमच्या लक्षात

googlenewsNext

सलमान खानने आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. पण त्याच्या चित्रपटांत एकदाही त्याने किसींग सीन दिलेले नाहीत. सलमान कोणताही चित्रपट साईन करण्याआधीच तो चित्रपटात किसिंग सीन देणार नाही याविषयी स्पष्ट सांगतो त्यानंतरच चित्रपटाची ऑफर स्विकारतो. सलमानने चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वीच तो कधी कोणत्या चित्रपटात किसिंग सीन देणार नाही असे त्याने ठरवले होते. सलमान हा आयुष्यात कोणत्याही गोष्टीपेक्षा त्याच्या कुटुंबाला सगळ्यात जास्त महत्त्व देतो. त्याच्यामते कुटुंब हे सगळ्यात महत्त्वाचे असते. त्यामुळेच त्याचा कोणताही चित्रपट लोकांनी आपल्या कुटुंबासोबत एकत्र पाहून पाहावा असे सलमानला वाटते आणि त्याचमुळे सलमानने चित्रपटात किसिंग सीन देण्याला त्याचा आजपर्यंत नकारच राहिला होता.

सलमानने त्याच्या कारकिर्दीत आजवर अनेक चित्रपटांमध्ये रोमँटिक अभिनेत्याची भूमिका साकारली आहे. त्याच्या भूमिकांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. पण कधीही चित्रपटांमध्ये रोमँटिक सीन देताना त्याने त्याची सीमा ओलांडली नाही. सलमान गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये काम करत आहे. त्यामुळे त्याच्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराला त्याच्या या अटीविषयी माहीत असते.

मात्र पहिल्यांदाच सलमान खान आता किसींग सीन देताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. राधेचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या संपूर्ण ट्रेलरमध्ये सलमानच्या एकाच सीनची जास्त चर्चा रंगली आहे. ती म्हणजे दिशा पटानीला सलमान किस देतानाचा हा सीन आहे. हा सीन पाहून सलमानने त्याचा इतक्या वर्षाचा नियम तोडल्याचे पाहायला मिळत आहे.

 

या सीनमुळे सलमानने ‘नो किसिंग’ नियम तोडल्याची जोरदार चर्चा रंगत आहे.या ट्रेलरमध्ये रणदीप हूडा व्हिलनच्या व्यक्तिरेखेत खूप डॅशिंग दिसला आहे. त्याचवेळी दिशा पाटनी देखील यात खूपच सुंदर दिसत होती. ट्रेलरमध्ये जॅकलिन फर्नांडिसचा डान्स नंबरही पाहायला मिळतोय.
 

Web Title: Salman khan fans reaction on disha salman kissing seen in radhe trailer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.