सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे रानू मंडल एका रात्रीत स्टार बनल्या. पश्चिम बंगालच्या रानाघाट रेल्वे स्टेशनवर रानू लता मंगेशकर यांचं एक प्यार का नगमा है हे गाणं गात होत्या. तिचा हा व्हिडिओ समोर आला आणि काही वेळातच तो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. त्यानंतर रानूचं आयुष्य बदललं आणि देशभरात ती लोकप्रिय झाली. 

इतकंच नाही तर हिमेश रेशमियाने रानू मंडलला आगामी चित्रपट हॅप्पी हार्डी अँड हीरमध्ये गाण्याची संधी दिली. त्यानंतर असं वृत्त समोर आलं की सलमान खाननं रानू मंडलला ५५ लाखाचा फ्लॅट गिफ्ट दिला आहे. यासोबतच असंही सांगितलं जातं होतं की, सलमाननं रानूला दबंग ३ चित्रपटात गाण्याची संधी दिली आहे. मात्र आता सलमानने हे सगळं वृत्त फेटाळून लावलं आहे.


सुरूवातीला सलमानने रानूला फ्लॅट गिफ्ट केल्याचं वृत्त आलं होतं तेव्हा रानू मंडलच्या मॅनेजरनं हे वृत्त खोटं असल्याचं सांगितलं होतं. आता सलमानने याबाबतचा खुलासा केला आहे. त्याने सांगितलं की, त्याने रानू मंडलला काहीच गिफ्ट केलेलं नाही.

त्याने बॉम्बे टाईम्सशी बोलताना सांगितलं की, हे वृत्त खोटं आहे. मीदेखील ही बातमी ऐकली. जर मी असं काहीच केलं नाही तर मी या गोष्टीचं क्रेडिट घेऊ शकत नाही. मी असं काहीच केलेलं नाही.


सलमान खान दबंग ३ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभू देवा करत आहे. या चित्रपटात सलमान पुन्हा एकदा चुलबुल पांडेची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात सलमान व्यतिरिक्त सोनाक्षी सिन्हा, अरबाज खान व सई मांजरेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

हा चित्रपट २० डिसेंबरला हिंदी, तमीळ, तेलगू व कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: Salman Khan Denied Rumours About Gifting A Flat To Ranu Mondal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.