salman khan and katrina kaif talks about co-star of bharat sunil grover | सुनील ग्रोव्हर बनला सलमान खान व कतरीना कैफचा ‘गुरू’!
सुनील ग्रोव्हर बनला सलमान खान व कतरीना कैफचा ‘गुरू’!

ठळक मुद्दे‘भारत’ हा चित्रपट एका गाजलेल्या कोरियन चित्रपटाचा रिमेक आहे.

‘रेस 3’ फ्लॉप झाल्यानंतर सलमान खानचा ‘भारत’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होतोय. साहजिकच या चित्रपटाकडून सलमानला प्रचंड अपेक्षा आहे. ‘सुल्तान’ आणि ‘टायगर जिंदा है’नंतर सलमान पुन्हा एकदा त्याचा आवडता दिग्दर्शक अली अब्बास जफरसोबत काम करतोय. ‘भारत’ हा चित्रपट एका गाजलेल्या कोरियन चित्रपटाचा रिमेक आहे. भारत-पाक फाळणीच्या पार्श्वभूमीवरच्या या चित्रपटात कतरीना कैफ, दिशा पाटणी, तब्बू असे अनेक दिग्गज कलाकार आहेत. याशिवाय आणखी एक दमदार कलाकार यात दिसणार आहे. तो म्हणजे, सुनील ग्रोव्हर.

खरे तर कॉमेडियन अशीच सुनील ग्रोव्हरची ओळख राहिली आहे. पण कदाचित लोकांसाठी. सलमान आणि कतरीना या दोघांसाठी तर तो ‘गुरू’ आहे.
तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण अलीकडे ‘भारत’च्या प्रमोशन इव्हेंटमध्ये सलमान व कतरीना सुनील ग्रोव्हरबद्दल भरभरून बोलले. सुनील ग्रोव्हर एक अतिशय प्रतिभावान अभिनेता आहे. तो केवळ मिमिक्री करत नाही तर आपल्या भूमिकेत शिरतो. मग ती भूमिका गुत्थीची असो वा डॉ मशहूर गुलाटीची. तो कुठल्याही भूमिकेला न्याय देऊ शकतो, असे सलमान म्हणाला.


कतरीनालाही राहावले नाही. तिनेही न थकता सुनीलची स्तुती सुरु केली. ‘भारत’च्या सेटवर अनेकदा आम्ही सकाळी ८ वाजता पोहोचायचो आणि सलमानसाठी प्रतीक्षा करत बसायचो. यादरम्यान मी आणि सुनील आम्ही दोघेही प्रचंड गप्पा करायचो. त्याचवेळी खरा सुनील मला कळला. तो केवळ एक प्रतिभावान अभिनेताच नाही तर त्याला सगळ्या गोष्टींची माहिती आहे. संस्कृती, पुस्तकांबद्दल त्याला कमालीचे ज्ञान आहे. त्याच्यासोबत तुम्ही कुठल्याही विषयावर गप्पा करू शकता,असे कतरीना म्हणाली. कतरीनाचे हे शब्द ऐकून सलमानची विनोद बुद्धी जागी झाली. मग काय, त्यानेही षट्कार ठोकला. सुनील ग्रोव्हर तुम्हाला कुठेही भेटला तर तुम्ही सर्व विषयांवर त्याच्याशी बोलू शकता. कारण कतरीनाने हे म्हटले आहे. तो आमचा गुरु आहे.अंतर्यामी आहे. त्याला सगळे काही ठाऊक आहे, असे सलमान म्हणाला. त्यावर कतरीना जोरजोरात हसू लागली.


Web Title: salman khan and katrina kaif talks about co-star of bharat sunil grover
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.