सैफ अली खानची बेगम करीना कपूर येत्या 21 सप्टेंबरला आपला बर्थ डे सेलिब्रेट करतेय. करीनाच्या बर्थ डेसाठी सैफ अली खान कुटुंबासोबत पतौडी पॅलेसला गेला आहे.  नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार सैफ अली खान पतौडी पॅलेसचा रस्ता विसरला. एअरपोर्टवरुन सैफने टॅक्सी हायर केली करीना मागच्या सीटवर बसली आणि सैफ पुढच्या सीटवर. जवळपास 2.30 च्या दोघे पतौडी शहरात पोहोचले. 

 सैफ मात्र पॅलेसकडे जाण्याएवजी बाजाराच्या रस्त्याच्या दिशेने पुढे गेला. थोडा अंतरानंतर सैफला कळले की तो चुकीच्या रस्त्याने पुढे जातो आणि मग त्याने तिथल्या काही विद्यार्थ्यांना रस्ता विसरला. सैफला बघून त्या विद्यार्थ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आणि त्याने त्याला पॅलेसकडे जाण्याचा बरोबर रस्ता सांगितला. रस्ता सांगणाऱ्या विद्यार्थ्यांनी सैफसोबत सेल्फि काढण्याची संधी मात्री सोडली नाहीय.  


21 सप्टेंबरला करीना आपला 39वा बर्थ डे साजरा करते आहे. बेगमच्या बर्थडे निमित्त पतौडी पॅलेसमध्ये बॉलिवूडच्या कलाकरांसाठी जंगी पार्टी ठेवण्यात येणार आहे. याची सध्या जोरदार तयारी सुरु आहे.  पतौडी पॅलेसचं रिनोव्हेशन सैफ अली खानने केलं होतं. या पॅलेसमध्ये एक मोठं ड्राईंग रुम, 7 बेडरुम आणि बिलियर्स रुमही आहे.


वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर करीना लवकरच 'हिंदी मीडियम २'मध्ये दिसणार आहे. या सिनेमात ती पोलिस अधिकारीच्या भूमिकेत दिसणार आहे. यात इरफान खान महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अंग्रेजी मीडियम चित्रपटाची निर्मिती दिनेश विजान करत असून दिग्दर्शन होमी अदाजानिया करत आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Saif ali khan reached pataudi palace to celebrate kareena kapoor's birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.