‘दबंग ३’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे सई मांजरेकर.  सई ही दिग्दर्शक - निर्माते महेश मांजरेकर आणि अभिनेत्री मेधा मांजरेकर यांची मुलगी आहे. 'दबंग 3' सिनेमानंतर सईलाही सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख मिळाली आहे. ती  सोशल मीडियावरही सक्रीय असते.  इतर अभिनेत्रींप्रमाणे सई देखील आपल्या पब्लिसिटीसाठी सोशल मीडियाचा पुरेपुर वापर करताना दिसते आहे. नित्यनियमाने सोशल मीडियावर ती आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. 

यामुळेच तिच्या फॉलोअर्सच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. नुकताच तिने साडीतला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.  या फोटोमधील सईचा अस्सल मराठमोळा लूक पाहून नेटकऱ्यांसह सेलिब्रिटीसुद्धा  फिदा झाले आहेत. साडी, नथ, चंद्रकोर टिकली, झुमक्यांनी तिच्या सौंदर्याला चारचाँद लावले आहेत.  या फोटोवर  फॅन्स आणि रसिकांकडून लाइक्स-कमेंट्सचा वर्षाव सुरू आहे. 

सईला आधीपासूनच अभिनेत्री व्हायचे होते. मात्र एक अशीही वेळ होती की,  त्यावेळी तिला वेगवेगळ्या प्रोफेशनमध्ये कन्फ्यूज होत असल्याचं तिने सांगितले.  एक वेळ असा आला होता ज्यावेळी मी न्यूरोसाइंटिस्ट पासून सुमो रेसरल पर्यंत सगळं काही मला बनायचे होते. मात्र अखेर दबंग 3 मुळे आता करिअररचा श्रीगणेशा केल्यानंतर आगामी काळात ती रसिकांचे कितपत मनोरंजन करते हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे. 

Web Title: Saiee Manjrekar In Saree To Steal Your Heart!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.