मागचं सारं काही विसरून रिया चक्रवर्तीनं केली पार्टी, ‘रोडिज’ फेम राजीव लक्ष्मणसोबतचे फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2021 03:11 PM2021-01-08T15:11:06+5:302021-01-08T15:12:50+5:30

सुशांतचे चाहते संतापले...

roadies fame rajiv laxman shares his photos with rhea chakraborty | मागचं सारं काही विसरून रिया चक्रवर्तीनं केली पार्टी, ‘रोडिज’ फेम राजीव लक्ष्मणसोबतचे फोटो व्हायरल

मागचं सारं काही विसरून रिया चक्रवर्तीनं केली पार्टी, ‘रोडिज’ फेम राजीव लक्ष्मणसोबतचे फोटो व्हायरल

googlenewsNext
ठळक मुद्दे रियाच्या सपोर्टमध्ये ट्वीट करणाऱ्याला पैसे मिळत असल्याचा दावा सध्या सोशल मीडियावर केला जातोय. आता हा दावा किती खरा, किती खोटा ते आम्हाला ठाऊक नाही. पण इंटरनेटच्या जगात याची सध्या जोरदार चर्चा आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या निधनानंतर चर्चेत आलेली त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती आपल्या नॉर्मल लाईफमध्ये परतलीये. तिचे ताजे फोटो पाहून तरी हेच वाटते. ड्रग्जप्रकरणी अटक झाल्यानंतर रिया जवळपास महिनाभर तुरूंगात होती. सध्या ती जामीनावर आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर बरेच दिवस रिया पार्ट्या, मिटींग्सपासून दूर होती. पण आता दीर्घकाळानंतर रियाचे आयुष्य पूर्वपदावर आलेले दिसतेय. तूर्तास रियाचे पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

या फोटोमध्ये रिया ‘रोडिज’ फेम राजीव लक्ष्मणसोबत दिसतेय. रियाची जवळची मैत्रिण अनुषा दांडेकर हिने नुकतीच वाढदिवसाची पार्टी दिली. रियादेखील या पार्टीत सहभागी झाली. राजीवने या पार्टीतला एक फोटो शेअर केला. त्या फोटोमध्ये मध्ये रिया राजीवला मिठी मारत कॅमे-याला पोज देताना दिसतेय. ‘माय गर्ल’ या कॅप्शनसह राजीवने रियाचा हा फोटो शेअर केला आणि यानंतर थोड्याच वेळात डिलीटही केला. पण तोपर्यंत हा फोटो व्हायरल झाला होता.

रिया माझी जुनी मैत्रीण...

ट्रोल होताच राजीवने रियासोबतचा फोटो डिलीट केला. मात्र रियासाठी त्याने एक खास पोस्ट शेअर केली. रिया माझी जुनी प्रिय मैत्रिण आहे. तिला पुन्हा भेटून आनंद झाला. तिला शुभेच्छा, असे त्याने लिहिले. अर्थात यासोबतचे कमेंट्चे आॅप्शन त्याने बंद ठेवले. 

भडकले सुशांतचे चाहते
रिया व राजीवचा पार्टीतला हा फोटो व्हायरल होताच, सुशांतचे चाहते भडकले. राजीवने रियाला ‘माय गर्ल’ संबोधल्याने तर सुशांतच्या चाहत्यांचा पारा आणखीच चढला. यानंतर  चाहत्यांनी रिया व राजीव दोघांनाही जबरदस्त ट्रोल केले.

सपोर्टमध्ये ट्वीट करणाऱ्याला पैसे?

 रियाच्या सपोर्टमध्ये ट्वीट करणाऱ्याला पैसे मिळत असल्याचा दावा सध्या सोशल मीडियावर केला जातोय. आता हा दावा किती खरा, किती खोटा ते आम्हाला ठाऊक नाही. पण इंटरनेटच्या जगात याची सध्या जोरदार चर्चा आहे. सुशांत सिंग राजपूतच्या फॅन पेजवर रियासंदर्भात हा दावा केला जातोय. रियाच्या सपोर्टमध्ये ट्वीट करणाऱ्या प्रत्येकाच्या खात्यात तिची पीआर  टीम प्रत्येक ट्वीटमागे  दोन रूपये जमा करत असल्याचा हा दावा आहे. सुशांतच्या फॅन पेजवर ‘जस्टिस फॉर रिया’ नावाने केल्या गेलेल्या ट्वीटचा स्क्रिनशॉट शेअर केला गेला आहे.  ‘रिया परत आलीये आणि ती मनातून आनंदी आहे. तू खंबीर असल्याचे एक चांगले उदाहरण जगापुढे ठेवलेस,’ असे यात लिहिले आहे. दुस-या स्क्रिनशॉटमध्ये संबंधित ट्वीट करणाऱ्याच्या खात्यात 2 रूपये ट्रान्सफर करण्यात आल्याचा मॅसेज दिसतोय. अखेरच्या ट्वीटसाठी तुमच्या खात्यात 2 रूपये ट्रान्सफर करण्यात आलेय, असा हा मॅसेज आहे. हे स्क्रिनशॉट्स व्हायरल  झाल्यानंतर युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. आता या स्क्रिनशॉट्स आणि या दाव्यात किती सत्यता आहे, हे आम्हाला ठाऊक नाही. रिया स्वत: यावर काय खुलासा करते, हे पाहणे अशात इंटरेस्टिंग ठरणार आहे.

WHAT? रिया चक्रवर्तीच्या सपोर्टमध्ये ट्वीट करणाऱ्याला मिळताहेत पैसे? सोशल मीडियावर होतोय दावा

PICS : अनेक महिन्यानंतर घराबाहेर पडली रिया चक्रवर्ती, टी-शर्टवरील मॅसेजने अख्ख्या जगाला दिले उत्तर

Web Title: roadies fame rajiv laxman shares his photos with rhea chakraborty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.