ठळक मुद्देअक्षय कुमारने चक्क रितेश देशमुखच्या मोबाईलवरून विद्या बालनला आय लव्ह यू चा मेसेज केला होता. आता विद्या त्याच्यावर चिडणार अशी रितेशला खात्री होती. पण रिप्लायमध्ये त्याला किसचे स्मायली पाठवण्यात आले होते.

हाऊसफुल या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन सुरू आहे. या चित्रपटाची टीम विविध शहरात जाऊन या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. पण त्याचसोबत रिॲलिटी शोमध्ये देखील या कार्यक्रमाची टीम आपल्याला पाहायला मिळत आहे.

दिवाळीच्या उत्सवाचा आनंद लुटण्यासाठी द कपिल शर्मा शो या कार्यक्रमाच्या शनिवारच्या आणि रविवारच्या भागात खास हाऊसफुल 4 च्या टीमने हजेरी लावली होती. अक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल, किर्ती खरबंदा, कृती सॅनन, पूजा हेगडे, चंकी पांडे यांनी सगळ्यांनी या कार्यक्रमात हजेरी लावत मजा मस्ती केली. यांच्यासह निर्माते साजिद नाडियावाला देखील उपस्थित होते. 

अक्षय कुमार, रितेश आणि बॉबी यांनी या कार्यक्रमात त्यांच्या आयुष्यातील अनेक सिक्रेट्सविषयी सांगितले. हे बेबी या चित्रपटाच्यावेळेसचा एक किस्सा रितेशने या कार्यक्रमात सांगितला. अक्षय कुमारने चक्क रितेश देशमुखच्या मोबाईलवरून विद्या बालनला आय लव्ह यू चा मेसेज केला होता असे रितेशने सांगितले. रितेशला हे कळल्यावर आता विद्या त्याच्यावर चिडणार अशी त्याला खात्री होती. पण काही तरी वेगळेच घडले. रिप्लायमध्ये त्याला किसचे स्मायली पाठवण्यात आले होते. हा रिप्लाय पाहिल्यावर रितेशदेखील हैराण झाला. त्याला नंतर कळले की, विद्याचा फोन देखील अक्षयकडेच होता आणि त्यानेच हे स्मायली पाठवले होते. हा किस्सा ऐकून उपस्थितांना त्यांचे हसू आवरले नाही. 

तुम्ही कधी कोणाला प्रपोज केले असून त्यांनी तुम्हाला नकार दिला आहे का असे कपिलने अक्षय, रितेश, आणि बॉबीला विचारले. त्यावर रितेश म्हणाला की, मी ज्या मुलीला प्रपोज केले होते, त्या मुलीने होकार दिला की नकार हेच मला अद्याप माहीत नाही. कारण तिने मला याविषयी कधीच सांगितले नाही. हे ऐकून उपस्थित सगळेच हसू लागले. त्यावर अक्षय कुमार पुढे म्हणाला की, तो पूर्वी प्रचंड लाजाळू होता. तो एका मुलीबरोबर दोन वेळा कॅफे आणि चित्रपटांसाठी बाहेर गेला होता. पण त्या मुलींच्या नात्याकडून खूप जास्त अपेक्षा होत्या याची जाणीव त्याला त्या वयात झाली नव्हती. बहुधा मी अधिक रोमँटिक असावा असे तिला वाटत होते. मी तिचा हात पकडावा, तिला जवळ घ्यावे अशी तिची अपेक्षा होती. पण मी खूप लाजाळू असल्याने यातील काहीच करत नव्हतो. बहुधा त्यामुळेच ती मला सोडून गेली. 


Web Title: Riteish Deshmukh Shares How Akshay Kumar Tried To Set Him Up With Vidya Balan As A Prank
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.