ठळक मुद्देया व्हिडिओत रितेश जेनेलियाचे पाय दाबत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे तर जेनेलिया रितेशकडून स्वतःचे लाड करून घेत आहे, हेच आमच्या सुखी संसाराचे खरे रहस्य असल्याचे रितेशचे म्हणणे आहे. 

हिंदी चित्रपटसृष्टीतील क्युट कपल म्हणून अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा या जोडीकडे पाहिलं जातं. 'तुझे मेरी कसम' या सिनेमातून दोघांनी बॉलिवूडमध्ये पहिलं पाऊल ठेवलं आणि याच सिनेमातून दोघं आयुष्यभराचे जोडीदार बनले. त्यांच्या लग्नाला सहा वर्षांहून अधिक काळ झाला असून त्यांना दोन मुलं आहेत. बॉलिवूडमधील या प्रसिद्ध कपलच्या सुखी संसाराचे रहस्य काय आहे हे नुकतेच रितेशने सांगितले आहे.

जेनेलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला असून या व्हिडिओद्वारे रितेशने त्यांच्या सुखी संसाराचे रहस्य काय आहे हे त्यांच्या फॅन्सना सांगितले आहे. या व्हिडिओत रितेश जेनेलियाचे पाय दाबत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे तर जेनेलिया रितेशकडून स्वतःचे लाड करून घेत आहे, हेच आमच्या सुखी संसाराचे खरे रहस्य असल्याचे रितेशचे म्हणणे आहे. या व्हिडिओसोबत जेनेलियाने खूपच छान कॅप्शन लिहिली आहे. हॅपी वाईफ... हॅपी लाईफ... और जीने को क्या चाहिये...

रितेश आणि जेनेलिया यांच्या पहिल्या भेटीची कहाणी अतिशय रंजक असल्याचे तुम्हाला माहीत आहे का? दोघे काही वर्षांपूर्वी पहिल्यांदा हैदराबाद विमानतळावर भेटले. यावेळी १६ वर्षीय जेनिलिया तिच्या आईसोबत होती. रितेश म्हणजे महाराष्ट्रातील लोकप्रिय नेते आणि दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा लेक. मुख्यमंत्र्यांचा मुलगा असल्याने रितेशला भारी अ‍ॅटिट्यूड असेल असं त्यावेळी जेनिलियाला वाटलं होते आणि त्याचमुळे तिने रितेशकडे दुर्लक्ष करणेच पसंत केले होते. पण असे असूनही रितेश जेनिलिया आणि तिच्या आईसमोर प्रचंड नम्रपणेच वागत होता. 

जेनेलिया तर चित्रीकरण सुरू झाल्यानंतरही जवळजवळ दोन दिवस रितेशशी बोललीच नव्हती. पण काहीच दिवसांत त्यांच्यात खूप चांगली मैत्री झाली. तुझे मेरी कसम या चित्रपटाचे चित्रीकरण हैद्राबादमध्ये सुरू असल्याने या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी त्यांनी एकमेकांसोबत खूप वेळ घालवला होता. चित्रीकरण संपल्यावर मुंबईत परतल्यावर ते दोघे एकमेकांना मिस करू लागले. एकमेकांना भेटण्याची ते संधीच शोधत असत. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात कधी पडले हे त्या दोघांना देखील कळले नव्हते.


Web Title: Riteish Deshmukh reveals the secret to his happy married life with wife Genelia D'Souza
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.