ठळक मुद्दे रिचा आणि अली फजल जवळजवळ पाच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.

फुकरे, फुकरे रिटर्न्स यासारख्या चित्रपटांत काम करणारी अभिनेत्री रिचा चड्ढा सध्या तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चा आहे. रिचा लवकरच अभिनेता अली फजलसोबत लग्न करणार आहे. तत्पूर्वी रिचा व अलीने गुपचूप साखरपुडा उरकल्याचे कळतेय. अद्याप या कपलने याबाबतची कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण सोशल मीडियावर रिचाने शेअर केलेल्या इन्स्टास्टोरीवरून दोघांनी साखरपुडा केल्याचा अंदाज बांधला जात आहे.
रिचाने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक स्टोरी शेअर केली होती.  हा एक व्हिडीओ होता. आता तिने हा डिलीट केला आहे. या व्हिडीओतील रिचाच्या बोटातील अंगठीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. यानंतर रिचाने गुपचूप साखरपुडा केल्याचे मानले जात आहे.

रिचा व अली फजल येत्या 15 एप्रिलला लग्न करणार असल्याचे कळतेय. दोघांनीही कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीत हे कोर्ट मॅरेज होईल. यानंतर एक ग्रॅण्ड रिसेप्शन होईल. चर्चा खरी मानाल तर दोघांनी कोर्ट मॅरेजसाठी अर्जही केला आहे.

या अर्जाचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होतोय. लग्नानंतर 18 एप्रिलला लखनौत आणि 21 एप्रिलला मुंबईत ग्रॅण्ड रिसेप्शन दिले जाईल.

बॉलिवूड अभिनेत्री रिचा आणि अभिनेता अली फजल जवळजवळ पाच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. 74 व्या वेनिस फिल्म फेस्टिवलदरम्यान एकत्र रेड कार्पेटवर उतरत रिचा  व अलीने आपले नाते जगजाहिर केले होते. तेव्हापासून आजपर्यंत हे कपल अगदी खुल्लम खुल्ला फिरताना दिसले. अर्थात लग्नाच्या प्रश्नावर मात्र दोघांनीही चुप्पी साधली होती. आता मात्र रिचा  व अली दोघेही लग्नासाठी तयार आहेत, असे म्हणायला हरकत नाही.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Richa Chadha Flaunts Her Engagement Ring After Announcing Wedding With Ali Fazal-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.