रिया चक्रवर्तीचा व्हेकेशन मूड ऑन; अलिबागच्या 'या' व्हिलामध्ये एक रात्र राहण्यासाठी देतीये इतकं भाडं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 02:19 PM2022-01-19T14:19:23+5:302022-01-19T14:20:07+5:30

Rhea chakraborty: या कटू आठवणी विसरुन रियाने तिच्या करिअरकडे लक्ष केंद्रित केलं आहे. सध्या रिया अलिबागमध्ये तिचा क्वालिटी टाइम घालवत असून येथील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

rhea chakraborty enjoys luxurious vacation in alibaug | रिया चक्रवर्तीचा व्हेकेशन मूड ऑन; अलिबागच्या 'या' व्हिलामध्ये एक रात्र राहण्यासाठी देतीये इतकं भाडं

रिया चक्रवर्तीचा व्हेकेशन मूड ऑन; अलिबागच्या 'या' व्हिलामध्ये एक रात्र राहण्यासाठी देतीये इतकं भाडं

Next

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचं  (sushant singh rajput) निधन होऊन आता बराच काळ लोटला आहे.  मात्र, त्याच्या आठवणी आजही चाहत्यांच्या मनात ताज्या आहेत. सुशांतचं निधन झाल्यानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती (rhea chakraborty) चांगलीच चर्चेत आली होती. अनेकांनी रियाला सुशांतच्या मृत्यूसाठी जबाबदार धरलं होतं. इतकंच नाही तर तिला अनेक दिवस तुरुंगातही काढावे लागले होते. परंतु, या कटू आठवणी विसरुन रियाने तिच्या करिअरकडे लक्ष केंद्रित केलं आहे. तसंच आता ती सोशल मीडियावरही चांगलीच अॅक्टीव्ह झाली आहे. सध्या रिया अलिबागमध्ये तिचा क्वालिटी टाइम घालवत असून येथील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

काही दिवसांपूर्वीच रिया अलिबागला सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेली आहे. या सुट्ट्यांमधील अनेक फोटो, व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत आहे. विशेष म्हणजे रिया अलिबागमध्ये एका महागड्या रिसॉर्टमध्ये राहत असून या रिसॉर्टचं एका दिवसाचं भाडं थक्क करणारं आहे.

रियाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये या रिसॉर्टचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने ती राहत असलेल्या रिसॉर्टच्या रुमची एक झलक दाखवली आहे. विशेष म्हणजे रिया राहत असलेली रुम प्रचंड आलिशान आणि सुंदर असल्याचं दिसून येत आहे. परंतु, तिची किंमत प्रचंड मोठी असल्याचं समोर आलं आहे.

रिया अलिबागमध्ये एका विस्टा रुमध्ये राहत आहे. या व्हिलामध्ये सहा बेडरुम, ज्यातील चार व्हिला ग्राऊंड फ्लोअरवर आहेत.तर दोन आऊट हाऊस आहेत. तसंच या ठिकाणी अनेक फळझाडं आणि फुलं झाडे आहेत. तसंच एक मोठा स्विमिंग पूलदेखील आहे. विशेष म्हणजे रिया राहात असलेल्या या व्हिलातील एका रुमचं एका दिवसाचं भाडं ३५ हजार २०० रुपये इतकं आहे.

दरम्यान, २०२० या वर्षात रियाला अनेक संकटांना समोरं जावं लागलं. एकीकडे रियाला सुशांतच्या मृत्यूसाठी जबाबदार धरण्यात आलं होतं. तर दुसरीकडे तिच्या भावाला ड्रग्स प्रकरणी अटक करण्यात आली होती.  रिया चक्रवर्तीने २००९ मध्ये एमटीव्हीच्या 'स्कूटी टीन डीवा' या शोपासून तिच्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर तिने 'मेरे डॅड की मारुती', जलेबी, 'सोनाली केबल', 'हाफ गर्लफ्रेंड' आणि अन्य काही चित्रपटांमध्ये काम केलं. तसंच अलिकडेच ती 'चेहरे' या चित्रपटात झळकली होती.
 

Web Title: rhea chakraborty enjoys luxurious vacation in alibaug

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app