Rekha's first husband daughter working in bollywood | रेखाच्या पहिल्या नवऱ्याची मुलगी आहे 'ही' अभिनेत्री, बोल्डनेसमुळे राहते नेहमी चर्चेत....

रेखाच्या पहिल्या नवऱ्याची मुलगी आहे 'ही' अभिनेत्री, बोल्डनेसमुळे राहते नेहमी चर्चेत....

आपल्या सदाबहार आणि मादक सौंदर्यासाठी अभिनेत्री रेखा आजही चर्चेत असते. इतकी वर्षे होऊनही तिच्या चाहत्यांमध्ये जराही कमतरता आलेली नाही. एखाद्या सिनेमाच्या कथेसारखी वादळी आयुष्य जगणाऱ्या रेखाच्या जीवनातील लोकही चर्चेचा विषय ठरले होते. यातीलच एक म्हणजे रेखाचा पहिला पती अभिनेता विनोद मेहरा. याच विनोद मेहराची मुलगी सिने इंडस्ट्रीत काम करते. पण ती अजून फारशी प्रकाशझोतात आलेली नाही. सोनिया मेहरा असं तिचं नाव असून अनेकांना हे माहीत नसेल की, तिने आतापर्यंत ४ सिनेमात काम केलंय. सोनिया मेहराने बॉलीवूड मध्ये पदार्पण केल्यावर तिचे व रेखाचे नाव परत चर्चेत आले होते.

रेखा आणि विनोद मेहरा यांची लव्हस्टोरी सर्वांनाच माहीत आहे. दोघांनी लपून लग्न केले होते. पण त्यांच्यातील वादांमुळे आणि विनोदच्या घरातील विरोधामुळे हे लग्न फार काळ टिकलं नाही. विनोद मेहराला इतका विरोध झाला की, दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. रेखानंतर विनोद मेहराने तीन लग्ने झाली. त्यातील तिसऱ्या पत्नीची मुलगी सानिया आहे.

सोनिया जेव्हा ४ वर्षाची तेव्हा तिचे वडील विनोद मेहरा हे जग सोडून गेले. यानंतर सोनियाचा सांभाळ तिच्या आजी- आजोबाने केला. महत्वाची बाब म्हणजे सोनिया वयाच्या ८ व्या वर्षापासून अभिनयाचे धडे घेत आहे. इतकेच नाही तर सोनियाला लंडन एकॅडमी ऑफ म्यूजिक एंड ड्रामेटिक आर्ट्स मधून अभिनयाकरिता गोल्ड मेडल देखील मिळाले आहे.

जेव्हा ती १७ वर्षाची झाली तेव्हा ती भारतात परत आली. इथे आल्यावरही तिने अनुपम खेर यांच्या अॅक्टिंग स्कूल मध्ये ३ महिन्याचा कोर्स देखील केला आहे. सोनियाने “विक्टोरिया नंबर २०३’ या सिनेमातून डेब्यू केलं होतं. सोनियाने आत्तापर्यत ४ सिनेमात काम केले आहे. तिचा शेवटचा सिनेमा “रागिणी एमएमएस २” हा होता.

हे पण वाचा :

चक्क मधुबाला विरोधात दिलीप कुमार यांनी कोर्टात दिली होती साक्ष, याच कारणाने तुटलं होतं नातं...

शाहरूख खानने सर्वांसमोर गोविंदाला मागितली होती माफी, 'हे' होतं कारण....

महेश बाबू ते प्रभास...! जाणून घ्या साऊथच्या या 14 सुपरस्टार्सचे ‘टॉप सीक्रेट’

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Rekha's first husband daughter working in bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.