शाहरूख खानने सर्वांसमोर गोविंदाला मागितली होती माफी, 'हे' होतं कारण....

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 01:04 PM2020-08-11T13:04:42+5:302020-08-11T13:11:21+5:30

दोघातील वादामुळेच त्यांनी कधी एकत्र एका सिनेमात काम केलं नाही. शाहरूख खानने गोविंदाबाबत फारच अपमानकारक असं वक्तव्य केलं होतं.

Bollywood king Shahrukh khan publicly apologized to Govinda for this reason | शाहरूख खानने सर्वांसमोर गोविंदाला मागितली होती माफी, 'हे' होतं कारण....

शाहरूख खानने सर्वांसमोर गोविंदाला मागितली होती माफी, 'हे' होतं कारण....

googlenewsNext

सध्या बॉलिवूडमधील नेपोटिज्मवरून मोठा वाद-विवाद सुरू आहे. अनेक सेलिब्रिटी एकमेकांवर टीका करत आहेत. पण फार कमी लोकांना  माहीत असेल की, बॉलिवूड किंग शाहरूख खान आणि अभिनेता गोविंदा यांच्यातही कधीकाळी कोल्ड वॉर चालू होतं. दोघातील वादामुळेच त्यांनी कधी एकत्र एका सिनेमात काम केलं नाही. शाहरूख खानने गोविंदाबाबत फारच अपमानकारक असं वक्तव्य केलं होतं. ज्यामुळे सगळ्यांसमोर शाहरूखला गोविंदाची माफी मागावी लागली होती. 

शाहरूख खान एकदा म्हणाला होता की, गोविंदा कधीही त्याने केलं तशा प्रकारचं काम करू शकत नाही. इतकेच नाही तर तो असाही म्हणाला होता की, गोविंदाने कधीही चांगलं काम केलं नाही. आता बॉलिवूड किंग शाहरूख खानने चक्क गोविंदाबाबत असं वक्तव्य केल्याने गोविंदाची आई चांगलीच नाराज झाली होती. 

मात्र, नंतर शाहरख खानने त्याच्या गोविंदाबाबतच्या वक्तव्यासाठी सर्वांसमोर माफी मागितली होती. तसेच स्पष्ट केलं होतं की, त्याला तसं बोलायच नव्हतं. त्याच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. गोविंदाने शाहरूख खानला त्याच्या वक्तव्याबाबत माफही केले होते. इतकेच नाही तर  नंतर दोघे चांगले मित्रही झाले होते.

दरम्यान, शाहरूख खान त्याच्या आगामी सिनेमाच्या तयारीत आहे. अशी चर्चा आहे की, शाहरूख खान दिग्दर्शक राजू हिराणीच्या सिनेमात दिसणार आहे. यात तो एका पंजाबी मुलाची भूमिका साकारेल. तसेच दुसरीकडे शाहरूख खान सिद्धार्थ आनंदच्या सिनेमातही दिसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या सिनेमात शाहरूखसोबत दीपिका पादुकोण दिसणार आहे.

हे पण वाचा :

चक्क मधुबाला विरोधात दिलीप कुमार यांनी कोर्टात दिली होती साक्ष, याच कारणाने तुटलं होतं नातं...

असा आहे सुनील शेट्टीचा राजेशाही थाट, एकही सिनेमा न करता दरवर्षी कमावतो 100 कोटी!

बॉलिवूडमध्ये 'या' 10 मोठ्या कॅम्पचे राज्य, यांचेच सिनेमे करतात गलेलठ्ठ कमाई

Web Title: Bollywood king Shahrukh khan publicly apologized to Govinda for this reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.