देओल कुटुंबातील तिसऱ्या पिढीनं बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आहे. सनी देओल यांचा मुलगा करण देओलपल पल दिल के पास चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकताच त्याच्या या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. या चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये सनी देओल करण सोबत स्पॉट झाले. मात्र ट्रेलर लाँचवेळी सनी देओल दिसले नाहीत.


पल पल दिल के पास चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी धर्मेंद्र आपल्या नातवाला पाठिंबा द्यायला आले होते. चित्रपटातील करणची सहकलाकार सहर बाम्बादेखील यावेळी उपस्थित होती.

या ट्रेलर लाँचवेळी सगळ्यांच्या नजरा सनी देओल यांना शोधत होते. मात्र ते त्यावेळी उपस्थित नव्हते. यामागचे कारण नुकतंच करण देओलनं सांगितलं. त्याने मीडियासोबत बोलताना सांगितलं की, सनी देओल बटाला फॅक्टरी ब्लास्टमधील पीडितांना भेटण्यासाठी गुरदारपुरला गेले होते. त्यामुळे ते ट्रेलर लाँचला उपस्थित राहू शकले नाहीत.


करण म्हणाला की, गुरदासपुरमध्ये दुर्देवी घटना घडली. त्यामुळे माझे वडील ट्रेलर लाँचला उपस्थित राहू शकले नाहीत. ते त्यांचं कर्तव्य बजावण्यासाठी गेले. त्यांना माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे आता माझी वेळ आहे प्रत्येक काम पुढे नेण्याचे.


पंजाबमधील गुरदासपुरमधील बटाला येथली अवैध फटाक्याच्या फॅक्टरीमध्ये स्फोट झाला होता. या घटनेत जवळपास २३ लोकांचा मृत्यू झाला. काही लोक जखमी झाले.  सनी देओल गुरदासपुरचे खासदार आहेत. त्यामुळे त्यांना हे वृत्त समजताच ते घटनास्थळची परिस्थिती पाहण्यासाठी निघून गेले.


करण देओलचा बॉलिवूडमधील पहिला चित्रपट पल पल दिल के पास २० सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: for this reason sunny deol did not attend son karan deol pal pal dil ke paas trailer launch event

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.