reason behind karan johar show koffee with karan to go off air | काय या कारणांमुळे बंद होणार करण जोहरचा ‘कॉफी विद करण’ हा चॅट शो?

काय या कारणांमुळे बंद होणार करण जोहरचा ‘कॉफी विद करण’ हा चॅट शो?

ठळक मुद्देसुशांत सिंग राजपूत याची आत्महत्या आणि यानंतर करण जोहरविरोधात सोशल मीडियावर सुरु झालेली मोहिम बघता ‘कॉफी विद करण’ आपल्या कुठल्याही चॅनलवर प्रसारित न करण्याचा निर्णय स्टार वर्ल्डने घेतल्याचे कळतेय.

करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’ या चॅट शोचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक वाईट  बातमी आहे. होय, चर्चा खरी मानाल तर करणचा हा शो लवकरच बंद होणार असल्याचे कळतेय.  हा शो प्रसारित करणारे स्टार वर्ल्ड हे चॅनल  भारतात बंद होण्याच्या हालचालींना वेग आला आहे. परिणामी करणचा  हा चॅट शोही बंद होणार आहे.
 स्टार वर्ल्डला भारतात बंद करण्याचे प्लानिंग गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहे. अशात चॅनलने आधी करणचा ‘कॉफी विद करण’ हा शो अन्य चॅनलवर प्रसारित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सुशांत सिंग राजपूत याची आत्महत्या आणि यानंतर करण जोहरविरोधात सोशल मीडियावर सुरु झालेली मोहिम बघता ‘कॉफी विद करण’ आपल्या कुठल्याही चॅनलवर प्रसारित न करण्याचा निर्णय स्टार वर्ल्डने घेतल्याचे कळतेय.

‘कॉफी विद करण’ हा करणचा चॅट शो सुरुवातीला बराच लोकप्रिय झाला होता. यानंतरच्या काळात या शोने काही वादही ओढवून घेतले होते.
रणबीर कपूर एका मुलाखतीत करणच्या या शोबद्दल बोलला होता. मी या शोमध्ये येऊ इच्छित नाही, असे मी करणला स्पष्टपणे सांगितले होते. मी आणि अनुष्का याचा विरोधही करणार होतो. हा शो रोखण्यासाठी आम्ही संपूर्ण इंडस्ट्रीला एकत्र आणू इच्छित होतो. कारण ते पैसे बनवतात. आम्ही शोमध्ये जातो, आम्हाला प्रश्न विचारले जातात आणि या प्रश्नांमुळे आम्ही अनेकदा गोत्यात येतो. हे ठीक नाही, असे रणबीर म्हणाला होता.

करण जोहरच्या शोने अनेकदा स्टार्सला संकटात टाकले आहे. शोमध्ये एकदा करणने आलियाला प्रश्न विचारला होता. सुशांत सिंग राजपूत, रणबीर कपूर व रणवीर सिंग यापैकी कोणाला तू मारणार, कोणाशी लग्न करणार आणि कोणाशी हुकअप करणार? असा प्रश्न करणने आलियाला केला होता. यावर रणबीर कपूरसोबत लग्न करायल. आवडेल, सुशांतला मी मारू इच्छिणार आणि रणवीरशी हुकअप करायला आवडणार, असे आलिया म्हणाली होती. सुशांतच्या आत्महत्येनंतर आलियाची ही क्लीप व्हायरल झाली होती. यावरून ती प्रचंड ट्रोलही झाली होती.

Read in English

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: reason behind karan johar show koffee with karan to go off air

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.