Raveena Tandon look from KGF Chapter 2 released on her birthday | 'KGF: Chapter 2' मध्ये अशी दिसेल रवीना टंडन, बर्थडेला रिलीज केला दमदार लूक...

'KGF: Chapter 2' मध्ये अशी दिसेल रवीना टंडन, बर्थडेला रिलीज केला दमदार लूक...

KGF सिनेमाचा सीक्वल 'KGF - Chapter 2' ची घोषणा झाल्यापासूनच या सिनेमाची वेगवेगळ्या कारणांनी चर्चा होत आहे. त्यातील एक महत्वाचा कारण म्हणजे यात संजय दत्त भूमिका करणार आहे. त्यासोबत या सिनेमात अभिनेत्री रवीना टंडन वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. बऱ्याच वर्षांनी ती सिनेमात करणार असल्याने तिच्या फॅन्समध्ये या सिनेमाची उत्सुकता आहे. यातील संजय दत्तचा लूक चांगलाच गाजत आहे. अशात आता या सिनेमातील रवीना टंडनचा लूक रिलीज करण्यात आला आहे. रवीनाच्या वाढदिवशी तिला हे खास गिफ्ट देण्यात आलंय.

केजीएफमध्ये रवीना टंडनचा लूक इंटेन्स आणि शक्तिशाली वाटतो आहे. रवीनाने स्वत: तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपला हा लूक शेअर केला आहे. या फोटोसोबत तिने पोस्टमध्ये लिहिले की, 'क्रुरतेला उत्तर. सादर आहे केजीएफ चॅप्टर २ ची रामिका सेन. गिफ्टसाठी धन्यवाद केजीएफ टीम'. (Bday Special : अक्षय कुमारसोबत रवीनाने गुपचूप केला होता साखरपुडा, पण 'या' चुकीमुळे तुटलं दोघांचं नातं...)

या सिनेमात अधीराची भूमिका साकारणाऱ्या संजय दत्तचा लूक रिलीज केला होता. संजयचा हा लूक सर्वांनाच आवडला. तर त्याचे फॅन्स हा सिनेमा बघण्यासाठी आतुर झाले आहेत. तसेच मेकर्सनी या सिनेमातील मुख्य अभिनेत्री श्रीनिधी शेट्टीचा एक फोटोही रिलीज केला होता. (46 वर्षांची झाली मस्त मस्त गर्ल रवीना टंडन, इतक्या कमी वयात आहे एका नातवाची आजी....)

केजीएफच्या पहिल्या सिनेमाला मिळालेल्या जोरदार यशानंतर केजीएफ २ ची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. सिनेमाची लोकप्रियता बघता. यावेळी कास्टही मोठी निवडली गेली आहे. रवीना टंडनसोबतच यश, संजय दत्त, बालाकृष्ण, अनंत नाग, मालविका अविनाश आणि प्रकाश राज यांच्या मुख्य भूमिका आहेत. सध्या या सिनेमाचं थोडं शूटींग शिल्लक आहे. हा सिनेमा पुढील वर्षी जानेवारीमध्ये रिलीज होईल.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Raveena Tandon look from KGF Chapter 2 released on her birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.