46 वर्षांची झाली मस्त मस्त गर्ल रवीना टंडन, इतक्या कमी वयात आहे एका नातवाची आजी....

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2020 01:36 PM2020-10-26T13:36:05+5:302020-10-26T14:17:42+5:30

बॉलिवूडची मस्त मस्त गर्ल रवीना टंडन आज आपला बर्थडे सेलिब्रेट करते आहे. रवीवाने आपल्या सिनेमामधून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. रवीना 46व्या वर्षी आजी झाली आहे. (Photo Instagram)

रवीना 2019 मध्ये आजी झाली आहे. रवीनाने आपल्या नातवासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर देखील केला होता. (Photo Instagram)

रवीनाने 1995 मध्ये दोन मुली दत्तक घेतल्या होत्या. छाया आणि पूजा ही त्यांची नावे. त्यावेळी पूजाचे वय 11 वर्षं होते तर छाया आठ वर्षांची होती.(Photo Instagram)

रवीना टंडनने या दोन्ही मुली वाढवल्या आणि त्यांचे लग्न केले. छायाने 2019 मध्ये मुलाला जन्म दिला. ज्याचे नाव रुद्र ठेवण्यात आले. रुद्रबरोबरचे फोटो रवीना अनेकवेळा शेअर करत असते.(Photo Instagram)

22 फेब्रुवारी 2004 रोजी रवीनाने फिल्म डिस्ट्रीब्युटर अनिल थडानीसेबत लग्न केले. या दोघांना 14 वर्षांची मुलगी राशा आणि 11 वर्षांचा मुलगा आहे. (Photo Instagram)

रवीनाने तिच्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये एक काळ गाजवला आहे. (Photo Instagram)

तिने अनेक हिट चित्रपट दिले असून तिच्या अभिनयासाठी तिला अनेक पुरस्काराने देखील गौरवण्यात आले आहे. (Photo Instagram)

मोहरा, लाडला, दिलवाले, अंदाज अपना अपना यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने एकापेक्षा एक सरस भूमिका साकारल्या. (Photo Instagram)

‘मोहरा’ हा तिचा चित्रपट सुपरहिट ठरला. यातील ‘तू चीज बडी है मस्त मस्त...’ हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले. याच गाण्यामुळे बॉलिवूडची 'मस्त मस्त गर्ल' म्हणून रवीना ओळखली जाऊ लागली. (Photo Instagram)

रवीना लकरच सुपरस्टार यशसोबत ‘केजीएफ- चॅप्टर 2’ या सिनेमात झळकणार आहे. (Photo Instagram)