Bday Special : अक्षय कुमारसोबत रवीनाने गुपचूप केला होता साखरपुडा, पण 'या' चुकीमुळे तुटलं दोघांचं नातं...

Published: October 26, 2020 11:50 AM2020-10-26T11:50:50+5:302020-10-26T11:58:12+5:30

मीडिया रिपोर्ट्नुसार, ९०च्या दशकात अक्षय आणि रवीना यांची लव्हस्टोरी 'मोहरा' सिनेमाच्या सेटवर फुलली.

बॉलिवूडमध्ये स्टार्सचं एकमेकांच्या जवळ येणं सामान्य बाब आहे. हे स्टार्ससोबत काम करताना एकमेंकांच्या इतके जवळ येतात की, एकमेकांच्या प्रेमात पडतात. पण प्रेमाचा हा प्रवास जेवढा सोपा वाटतो, तो निभावणं तेवढंच कठिण असतं.

अशात बॉलिवूडमध्ये अशा अनेक प्रेम कहाण्या आहेत ज्यांचा शेवट चांगला झाला नाही. अशीच एक प्रेम कहाणी अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांची आहे. आज रवीना टंडनचा ४७वा वाढदिवस ती साजरा करत आहे. चला जाणून घेऊ त्यांच्या अधुऱ्या प्रेम कहाणीबाबत....

मीडिया रिपोर्ट्ननुसार, ९०च्या दशकात अक्षय आणि रवीना यांची लव्हस्टोरी 'मोहरा' सिनेमाच्या सेटवर फुलली. १९९४ मध्ये आलेल्या सिनेमाच्या रिलीजवेळी दोघेही चांगलेच जवळ आले होते. ऑनस्क्रीनसोबतच त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्रीही चर्चेत होती.

दोघांची लव्हस्टोरी त्यांच्या फॅन्सना फरफेक्ट वाटत होती. दोघेही पंजाबी आणि एकमेकांसोबत चांगलेही दिसत होते. सर्वांना वाटत होतं की, दोघेही लवकरच त्यांच्या लग्नाची घोषणा करतील. इतकेच काय तर रवीनाने सिनेमे साइन करणंही बंद केलं होतं. कारण अक्षयची इच्छा होती की, तिने लग्नानंतर सिनेमात काम करू नये.

1999 मध्ये स्टारडस्टला दिलेल्या एका मुलाखतीत रवीनाने खुलासा केला होता की, अक्षय कुमार म्हणाला होता की, जसेही मी माझ्या लिस्टमधील सिनेमाची शूटींग पूर्ण करेल तो माझ्याशी लग्न करेल. रवीनाने असाही खुलासा केला होता की, दोघांनी मंदिरात गुपचूपपणे साखरपुडाही केला होता.

अक्षयला हे लपवायचं होतं कारण त्याला त्याच्या फीमेल फॅन्सना गमावण्याची भीती होती. काही काळ अक्षय आणि रवीनात सगळं काही ठीक होतं. पण १९९६ मध्ये खिलाडियों का खिलाडी च्या रिलीजवेळी गोष्टी बदलल्या.

यादरम्यान अक्षय-रेखाच्या लिंकअपच्या स्टोरीज समोर आल्याने रवीना हैराण झाली होती. अक्षयच्या रंगीन स्वभावामुळे ती आधीच परेशान होती. त्यात रेखासोबत त्याची वाढती जवळीकता पाहून रवीनाला धक्का बसला. रवीना त्याचं हे वागणं सहन करू शकली नाही.

अक्षयच्या या चुकीमुळे तिनेच अक्षयसोबतचं नातं तोडलं. तिने मीडियात अक्षय विरोधात काही मुलाखतीही दिल्या होत्या. तेव्हा रवीना म्हणाली होती की, प्रेमात विश्वासच सगळं काही असतो आणि अक्षयने तिचा विश्वासघात केलाय.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रवीनासोबतच अक्षय आणखी दोन मुलींसोबत सीक्रेट साखरपुडा केला होता. १९९९ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत रवीना म्हणाली होती की, अक्षय ज्या स्पीडने मुलांनी प्रपोज करत आहे, त्या स्पीडने मुंबईतील अर्ध्यापेक्षा जास्त तरूणींच्या आई-वडिलांना त्याला मॉम-डॅड म्हणावं लागेल.

अक्षयने दगा दिला त्यासाठी रवीनाची माफी मागितली होती. पण रवीनाने त्याला माफ केलं नाही. अशाप्रकारे दोघांच्या लव्हस्टोरीचा अंत वाईट झाला. काही वर्षांनी रवीनाने फिल्म फायनान्सर अनिल थडानीसोबत लग्न केलं. तर नंतर अक्षयने ट्विंकल खन्नासोबत लग्न केलं.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Read in English