Ranveer singh is spotted calling a woman bhabhi on that woman replied bhabhi mat bolna please | जब रणवीर आपको भाभी बुलाएं...! पाहा, रणवीर सिंगचा मजेदार व्हिडीओ
जब रणवीर आपको भाभी बुलाएं...! पाहा, रणवीर सिंगचा मजेदार व्हिडीओ

ठळक मुद्देरणवीरच्या वर्कफ्रंट बद्दल सांगायचे तर त्याचा ‘83’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

रणवीर सिंग पुन्हा हेडलाईन्समध्ये आलाय. होय, त्याचा  एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.  हा व्हिडीओ एका लग्न सोहळ्यातला असल्याचा दावा केला जातो. दिल्लीतल्या या लग्नात रणवीर धम्माल डान्स करताना दिसला होता. काल या लग्नाचे रणवीरचे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता एका महिलेसोबतचा त्याचा ताजा व्हिडीओ चर्चेत आहे.
दिल्लीच्या याच लग्नात रणवीरला एक महिला भेटली. रणवीरने तिला ‘भाभी‘ म्हणून हाक मारली. रणवीरने भाभी म्हणताच सगळे हसायला लागले. बिचारी ‘भाभी’ मात्र अक्षरश: चिडली. भाभी नहीं बोलना प्लीज, असे ती रणवीरला म्हणाली.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या रणवीर सिंगच्या व्हिडीओमध्ये दिसणारी महिला ही गुनित विरदी आहे. ही महिला एक सेलिब्रेटी मेकअप आर्टिस्ट असल्याचे म्हटले जातेय. गुनित हिने स्वत: रणवीरसोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘जब रणवीर आपको भाभी बुलाएं. दिल के अरमां आंसुओं में बह गए....’, असे तिने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले आहे.  

या व्हिडीओला आत्तापर्यंत 21 हजारांवर लाईक्स मिळाले आहेत. व्हिडीओमध्ये रणवीर वेगळ्याच अंदाजात दिसत आहे. रणवीर त्या महिलेला ‘भाभी’ का म्हणतोय, हे कळत नसले तरी या ‘भाभी’ला तो चांगल्याप्रकारे ओळखतो एवढे मात्र समजते.
रणवीरच्या वर्कफ्रंट बद्दल सांगायचे तर त्याचा ‘83’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात रणवीर कपिल देव यांची भूमिका साकरत आहे. तर त्याची पत्नी आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण कपिल देव यांची पत्नी रोमी भाटिया यांची भूमिका साकारत आहे. याशिवाय तो अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’मध्येही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

Web Title: Ranveer singh is spotted calling a woman bhabhi on that woman replied bhabhi mat bolna please

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.