बॉलिवूडची अभिनेत्री कतरिना कैफरणवीर सिंग पहिल्यांदाच एकत्र रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. ते दोघे रोहित शेट्टी दिग्दर्शित सूर्यवंशी सिनेमात एकत्र काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटात कतरिना कैफ, अक्षय कुमार यांच्यासोबत रणवीर सिंगदेखील दिसणार आहे. यापूर्वीच कतरिना कैफ व रणवीर सिंग यांचा एक फनी व्हिडिओ समोर आला आहे. हा प्रमोशनल व्हिडिओ आहे. या व्हिडिओत रणवीर सिंग नेहमीप्रमाणे बिनधास्त अंदाजात पहायला मिळाला. रणवीर त्याला हॉट बनव अशी विनंती कतरिना करताना दिसतो आहे.


कतरिना कैफने शेअर केलेल्या या व्हिडिओत ती रणवीर सिंग सोबत कॉस्मेटिक प्रोडक्टचं प्रमोशन करताना दिसते आहे. या व्हिडिओत ते दोघंही लाल रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसत आहेत. कतरिना लिपस्टिक लावत असताना रणवीर सिंगची एन्ट्री होते.रणवीर नेहमीप्रमाणे हटके अंदाजात दिसला. तो कतरिनाला भेटतो. त्यानंतर कतरिना रणवीरच्या डोळ्याला काजळ लावते. काजळ लावताना रणवीर म्हणाला की, पद्मावत आणि बाजीराव मस्तानी यासारख्या चित्रपटांसाठी यापूर्वी काजळचा वापर केला आहे.


‘सुर्यवंशी’ या सिनेमात अक्षय कुमार एटीएफ अधिका-याच्या भूमिकेत दिसणार आहे. दहशतवादाविरोधात तो लढताना दिसेल. हा सिनेमा पुढच्या वर्षी 27 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

‘सिम्बा’प्रमाणेच रोहित शेट्टीचा हा आगामी चित्रपटही एका साऊथच्या सिनेमाचा रिमेक असल्याचे मानले गेले होते. तामिळ भाषेतील ‘सूर्यवंशी’ याचाच हा हिंदी रिमेक असल्याची चर्चा  होती. ही बातमी आली आणि अनेकांचा चटकन विश्वास बसला. कारण रोहितने याआधीही अनेक दाक्षिणात्य चित्रपटांचे हिंदी रिमेक बनवले आहेत. पण ही बातमी ऐकताच रोहित प्रचंड संतापला होता.


‘सूर्यवंशी’ कुठल्याही चित्रपटात रिमेक नाही. ही एक ओरिजनल स्टोरी आहे.

दीर्घकाळापासून यावर काम सुरु होते, असे त्याने यानंतर स्पष्ट केले होते. तुम्हाला ठाऊक असेलच की, केवळ साऊथमध्येच नाही तर हिंदीतही ‘सूर्यवंशी’ नावाचा चित्रपट याआधी बनला आहे.

Web Title: Ranveer Singh Achieves ‘An Unprecedented Level Of Hotness’ When Katrina Kaif Puts Kajal On Him!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.