ठळक मुद्देसुशांत प्रकरणावरुन मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर कंगनाने प्रश्नचिन्ह उपस्थित करत मुंबई पोलिसांची भीती वाटते असे विधान तिने केले होते. तिच्या याच विधानावरुन राज्यात शिवसेना आणि कंगना असे महाभारत रंगले होते.

कंगना राणौत गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत होती. आताश: ती चित्रपटात बिझी झाली आहे. पण ती बिझी होताच, तिच्या बाजूने तिची बहीण रंगोली मैदानात उतरली आहे. काल शबाना आझमी यांनी कंगनावर टीका केली होती. कंगना केवळ हेडलाईन्समध्ये राहण्यासाठी अपमानास्पद वक्तव्य करते, असे त्या म्हणाल्या होत्या. शिवाय कंगना अभिनय चांगला करते. तिने तेच केले तर उत्तम, असा सल्लाही शबानांनी दिला होता. शबानांच्या या वक्तव्याला आता रंगोलीने प्रत्युत्तर दिले आहे. तुम्ही का तुमच्या कामापुरते मर्यादीत नाहीत? असा सवाल रंगोलीने केला आहे.


 

काय म्हणाली रंगोली?
शबानांना उत्तर देताना रंगोलीने लिहिले,‘बघा, सूसाईड गँग समोर आलीय... प्रिय शबानाजी, तुमच्यासाठी व तुमच्या पतीसाठी माझे काही प्रश्न आहेत.  तुम्ही दोघे तुमचा अभिनय व शायरीपर्यंत का मर्यादीत राहत नाही? तुम्ही का भारतविरोधी राजकारणात सामील होता? तुम्हीही हे हेडलाईन्ससाठी करता का की काही खास मुद्यांबद्दल विचार करता? तुमचा अँटी-इंडिया अजेंडा बरोबर असेल तर कंगनाचा अजेंडा बरोबर असू शकत नाही का? की तुमच्यासाठी वेगळे अन् तिच्यासाठी वेगळे नियम आहेत?’

काय म्हणाल्या होत्या शबाना?
चर्चेत राहण्यासाठी कंगना वाट्टेल ते बरळते. कदाचित चर्चेत नसू तर विस्मृतीत जाऊ, या भीतीपोटी ती सतत हेडलाईन्समध्राहते, अशी टीका शबाना यांनी केली होती. मुंबई मिररला दिलेल्या  मुलाखतीत शबाना यांनी कंगनाला लक्ष्य केले होते. ‘कंगना केवळ स्वत:च्या कल्पनेत वावरते. मी बॉलिवूडला फेमिनिझम शिकवला, मीच राष्ट्रवाद शिकवला, असे ती म्हणते. माझ्या मते, आपण चर्चेत राहिलो नाही तर काय होईल, ही भीती तिला आहे आणि म्हणूनच हेडलाईन्समध्ये राहण्यासाठी ती अपमानास्पद, वादग्रस्त विधाने करते. बिचारी कंगना, माझ्या मते, ती अ‍ॅक्टिंगमध्ये बेस्ट आहे, ती तेच का करत नाही?’,  असे त्या म्हणाल्या होत्या.

कंगना राणौत आणि शिवसेना वाद राज्यात पेटला होता. सुशांत प्रकरणावरुन मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर कंगनाने प्रश्नचिन्ह उपस्थित करत मुंबई पोलिसांची भीती वाटते असे विधान तिने केले होते. तिच्या याच विधानावरुन राज्यात शिवसेना आणि कंगना असे महाभारत रंगले होते.जर मुंबई पोलिसांची भीती वाटत असेल तर कंगनाने मुंबईत राहू नये असे संजय राऊत यांनी म्हटले होते. त्यावरच कंगनाने प्रत्युत्तर देत संजय राऊत मला मुंबई न येण्याची धमकी देत आहेत असा आरोप केला होता.

अभिनय चांगला करते, तिने तेच केले तर उत्तम...! शबाना आझमींचा कंगना राणौतला सल्ला

थलायवीच्या सेटवरचे कंगना राणौतचे फोटो आले समोर, दिवंगत मुख्यमंत्री जयललितांच्या गेटअपमध्ये दिसली अभिनेत्री

त्यानंतर कंगनानं मी मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर मला अडवून दाखवा असेआव्हानच शिवसेनेला दिले होते. इतकेचही तर कंगना राणौतने मुंबईचा पीओके म्हणून उल्लेख केला होता. याच दरम्यान मुंबई महापालिकेने कंगनाच्या कार्यालयावर हातोडा मारला होता. या संपूर्ण प्रकारानंतर कंगना राणौतने उद्धव ठाकरे यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत आव्हान दिले होते.

  

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: rangoli chandel reacts on shabana azmi comment on kangana ranaut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.