अभिनय चांगला करते, तिने तेच केले तर उत्तम...! शबाना आझमींचा कंगना राणौतला सल्ला

By रूपाली मुधोळकर | Published: October 6, 2020 11:57 AM2020-10-06T11:57:57+5:302020-10-06T11:59:39+5:30

म्हणाल्या, कंगना घाबरते, म्हणून बरळते..

Shabana Azmi on Kangana Ranaut: I think she fears the day when she will no longer be in the headlines | अभिनय चांगला करते, तिने तेच केले तर उत्तम...! शबाना आझमींचा कंगना राणौतला सल्ला

अभिनय चांगला करते, तिने तेच केले तर उत्तम...! शबाना आझमींचा कंगना राणौतला सल्ला

Next
ठळक मुद्देकंगना राणौत आणि शिवसेना वाद राज्यात पेटला होता. सुशांत प्रकरणावरुन मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर कंगनाने प्रश्नचिन्ह उपस्थित करत मुंबई पोलिसांची भीती वाटते असे विधान तिने केले होते.

गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री कंगना राणौत सतत चर्चेत आहे. सुशांत सिंग राजपूतसाठी न्यायाची मागणी असो किंवा महाराष्ट्र सरकारवरची टीका असो, एक ना अनेक कॉन्ट्रोवर्सीमुळे तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतलेय. निश्चितपणे कंगनाला सपोर्ट करणारे अनेक आहेत. परंतु तिचे टीकाकारही  कमी नाहीत. आता बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी कंगनाला फैलावर घेतलेय. चर्चेत राहण्यासाठी कंगना वाट्टेल ते बरळते. कदाचित चर्चेत नसू तर विस्मृतीत जाऊ, या भीतीपोटी ती सतत हेडलाईन्समध्राहते, अशी टीका शबाना यांनी केली.
मुंबई मिररला दिलेल्या ताज्या मुलाखतीत शबाना यांनी कंगनाला लक्ष्य केले. त्या म्हणाल्या,‘कंगना केवळ स्वत:च्या कल्पनेत वावरते. मी बॉलिवूडला फेमिनिझम शिकवला, मीच राष्ट्रवाद शिकवला, असे ती म्हणते. माझ्या मते, आपण चर्चेत राहिलो नाही तर काय होईल, ही भीती तिला आहे आणि म्हणूनच हेडलाईन्समध्ये राहण्यासाठी ती अपमानास्पद, वादग्रस्त विधाने करते. बिचारी कंगना, माझ्या मते, ती अ‍ॅक्टिंगमध्ये बेस्ट आहे, ती तेच का करत नाही?’

इंडस्ट्रीला लक्ष्य करणे सोपे
गेल्या काही दिवसांत बॉलिवूडला लक्ष्य केले जातेय. यापार्श्वभूमीवरही शबाना यांनी आपले मत मांडले. त्या म्हणाल्या, हिंदी चित्रपटसृष्टीने मला ओळख दिली आहे आणि या इंडस्ट्रीचा एक भाग असल्याचा मला अभिमान आहे. दुर्दैवाने बॉलिवूड इंडस्ट्रीला लक्ष्य करणे सर्वांसाठी सोपे आहे. गंभीर समस्यांपासून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा हा एक पद्धतशीर प्रयत्न आहे. ढासळती अर्थव्यवस्था, भारत-चीन सीमेवरचा तणाव, शेतक-यांची आंदोलने अशा सगळ्यां गंभीर मुद्यांवरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी पद्धतशीरपणे मोहिम चालवली जातेय,असेही त्या म्हणाल्या.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणाची दिशाच भरकटली
सुशांत सिंग राजपूत प्रकरणावरही त्या बोलल्या. सुशांत सिंग प्रकरणाची दिशा आता बदलली आहे. ‘सुशांतला न्याय’ मिळवूनऐवजी सध्या बॉलिवूडमधील ड्रग्ज अ‍ॅडिक्टवर लक्ष केंद्रीत केले गेले आहे. माझ्या मते, सद्यस्थितीत मानसिक आरोग्यावर गंभीर चर्चा व्हायला हवी. कारण ही एक गंभीर समस्या आहे. मात्र सध्या सर्वत्र सुशांत प्रकरणाच्या निमित्ताने सणसणी निर्माण केली जातेय.

कंगना राणौत आणि शिवसेना वाद राज्यात पेटला होता. सुशांत प्रकरणावरुन मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर कंगनाने प्रश्नचिन्ह उपस्थित करत मुंबई पोलिसांची भीती वाटते असे विधान तिने केले होते. तिच्या याच विधानावरुन राज्यात शिवसेना आणि कंगना असे महाभारत रंगले होते.जर मुंबई पोलिसांची भीती वाटत असेल तर कंगनाने मुंबईत राहू नये असे संजय राऊत यांनी म्हटले होते. त्यावरच कंगनाने प्रत्युत्तर देत संजय राऊत मला मुंबई न येण्याची धमकी देत आहेत असा आरोप केला होता.

बॉलिवूड 'क्वीन' कंगना राणौत राजकारणात यशस्वी होणार का? ज्योतिष्यांनी मांडली कुंडली

कंगनाला प्रसून जोशीचा सपोर्ट, म्हणाले - ती खरं बोलत आहे, निरर्थक बनवू नका...

त्यानंतर कंगनानं मी मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर मला अडवून दाखवा असेआव्हानच शिवसेनेला दिले होते. इतकेचही तर कंगना राणौतने मुंबईचा पीओके म्हणून उल्लेख केला होता. याच दरम्यान मुंबई महापालिकेने कंगनाच्या कार्यालयावर हातोडा मारला होता. या संपूर्ण प्रकारानंतर कंगना राणौतने उद्धव ठाकरे यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत आव्हान दिले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shabana Azmi on Kangana Ranaut: I think she fears the day when she will no longer be in the headlines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app