rajinikanth south film actor thavasi suffering from serious illness cancer | एकेकाळी पिळदार शरीर असलेल्या या अभिनेत्याची अशी झालीये अवस्था, उपचारासाठीही नाहीत पैसे

एकेकाळी पिळदार शरीर असलेल्या या अभिनेत्याची अशी झालीये अवस्था, उपचारासाठीही नाहीत पैसे

ठळक मुद्देथवासीने साऊथ इंडस्ट्रीत जवळपास 3 दशकांच्य करिअरमध्ये अनेक सिनेमात सहाय्यक भूमिका साकारल्या.

साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांच्यासारख्या दिग्गजासोबत काम करणारा विनोदी अभिनेता थवासी सध्या एका एका पैशासाठी मोताद झालाय. कर्करोगाशी झुंज देत असलेल्या थवासीजवळ उपचारासाठीही पैसे नाहीत.अशात सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून त्याने चाहत्यांना आर्थिक मदतीची विनंती केली आहे.
 थवासीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. एकेकाळी पिळदार शरीर असलेला थवासी याचे शरीर कर्करोगाने खंगलेय. उरलाय तो केवळ हातांचा सापळा.

 या व्हिडीओत अभिनेता थवासी म्हणतो, ‘मी अनेक सिनेमांत काम केले. 1993 साली प्रदर्शित Kizhakku Cheemayile पासून रजनीकांतच्या Annaatthe पर्यंत अनेक सिनेमे मी केलेत. माझ्यावर ही वेळ येईल, मी या आजाराच्या विळख्यात सापडेल, असा विचारही कधी केला नव्हता. मी माझ्या फिल्मी फॅमिली मेंबरकडे मदतीची याचना करतोय. माझ्या उपचारासाठी मदत करा.’

थवासीने साऊथ इंडस्ट्रीत जवळपास 3 दशकांच्य करिअरमध्ये अनेक सिनेमात सहाय्यक भूमिका साकारल्या. कीजहक्कु चीमाईले, अन्नथा यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: rajinikanth south film actor thavasi suffering from serious illness cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.