Met Gala 2019 मधील कपड्यामुळे प्रियंका चोप्रा राहिली आठवडाभर चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 08:00 PM2019-05-12T20:00:00+5:302019-05-12T20:00:02+5:30

प्रियंका चोप्राचे ‘मेट गाला 2019’मधील लूकचे फोटो पाहून भारतीय चाहते लोटपोट झाले. गेल्या कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावर तर तिच्या याच लूकची चर्चा आहे.

Priyanka Chopra's Met Gala 2019 look was in news | Met Gala 2019 मधील कपड्यामुळे प्रियंका चोप्रा राहिली आठवडाभर चर्चेत

Met Gala 2019 मधील कपड्यामुळे प्रियंका चोप्रा राहिली आठवडाभर चर्चेत

Next
ठळक मुद्देकुणी तिच्या केसांची तुलना वीरप्पनच्या मिशांशी केली, कुणी तिला विक्रम वेताळ म्हटले तर कुणी भूतनी. एकंदर काय तर प्रियंकाचा हा लूक पाहून सारेच जण चक्रावून गेले.

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा याहीवर्षी ‘मेट गाला 2019’मध्ये दिसली. पण यावेळी तिचा अंदाज पाहून अनेक जण चकीत झाले होते. प्रियंका पती निक जोनाससोबतमेट गाला 2019’च्या पिंक कार्पेटवर उतरली. ब्रांडच्या सॉफ्ट पेस्टल गाऊनमध्ये प्रियंकाने पिंक कार्पेटवर एन्ट्री घेतली. या थाई हाय स्लिट गाऊनवर पिंक आणि येलो फेदर लागलेले होते. या गाऊनमध्ये प्रियंका कमालीची सुंदर दिसत होती. पण या गाऊनसोबत प्रियंकाने कॅरी केलेल्या हेअरस्टाईल आणि मेकअपने मात्र सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

प्रियंकाच्या हेअरस्टाईलिस्टने तिला ‘अफ्रिकन कर्ल’ स्टाईलची हेअरस्टाईल दिली. यावर एक क्राऊनही चढवला. ‘मेट गाला’च्या यंदाच्या थीमनुसार प्रियंकाचा हा लूक एकदम परफेक्ट होता. पण देसी गर्लवर हा लूक अनेकांना रूचला नाही. तिची हेअर स्टाईल, त्यावरचा क्राऊन हे सगळेच चर्चेचा विषय ठरले. पिंक आणि शिमरी रंगाचा मेकअप आणि पांढऱ्या रंगाच्या आईब्रो पाहून प्रियंकाचा हा लूक क्षणात व्हायरल झाला नसेल तर नवल. काहींना प्रियंकाचा हा लूक आवडला पण अनेक जण प्रियंकाचा हा अवतार पाहून थक्क झाले. मग काय अनेकांनी प्रियंकाचा लूक पाहून खिल्ली उडवणे सुरू केले.

प्रियंका चोप्राचे ‘मेट गाला 2019’मधील लूकचे फोटो पाहून भारतीय चाहते लोटपोट झाले. गेल्या कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावर तर तिच्या याच लूकची चर्चा आहे. या लूकमुळे प्रियंकाला प्रचंड ट्रोल करण्यात आले. कुणी तिच्या केसांची तुलना वीरप्पनच्या मिशांशी केली, कुणी तिला विक्रम वेताळ म्हटले तर कुणी भूतनी. एकंदर काय तर प्रियंकाचा हा लूक पाहून सारेच जण चक्रावून गेले. तिच्या आऊटफिटचीही खिल्ली उडवली गेली. तिच्या या लूकपेक्षा, या लूकवरच्या मजेदार भन्नाट मीम्सनी लोकांचे अधिक मनोरंजन केले.  

प्रियंका चोप्राच्या या गाऊनची किंमत ही तब्बल 45 लाख रुपये एवढी असल्याचे सांगण्यात येत आहे. यासोबतच प्रियंकाने जे डायमंड इयरिंग घातले होते, त्याची किंमतही सुमारे 10 लाख रुपये एवढी आहे. 

Web Title: Priyanka Chopra's Met Gala 2019 look was in news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app