Pooja bhatt tweet viral on drugs she writes people use drugs to make the pain of living go away | लोक आपलं दु:ख दूर करण्यासाठी ड्रग्सचा वापर करतात, पूजा भट्टचं खळबळजनक ट्विट व्हायरल

लोक आपलं दु:ख दूर करण्यासाठी ड्रग्सचा वापर करतात, पूजा भट्टचं खळबळजनक ट्विट व्हायरल

अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी एनसीबी ड्रग्स अँगलचा तपास करत आहेत. याद दरम्यान अभिनेत्री आणि निर्माती पूजा भट्टने एका ट्विटमध्ये आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांवर प्रश्न उपस्थित केले आहेत, जे लोक दुःख कमी करण्यासाठी ड्रग्स घेतात.  अशा लोकांची कुणाला काळजी आहे आणि त्यांची दुर्दशा व समस्या माहित आहेत का, असा प्रश्न पूजाने विचारला आहे.

पूजाने ट्विटमध्ये लिहिले, समाजातील शेवटच्या उपेक्षित लोकांबद्दल कोणाला काळजी आहे का? जे ड्रग्स घेतात जेणेकरुन त्यांच्या आयुष्यातील दु:ख कमी होईल? आपली स्वप्न मिळवण्यासाठी ते खूप तुटलेले असतात आणि गरिबी आणि दु:खामध्ये या सर्व गोष्टींचा वापर करतात ? त्यांचे आयुष्य सुधारण्यात कोणाला रस आहे? पूजा भट्टच्या या ट्विटमुळे तिला चांगलेच ट्रोल केले जाते आहे. पूजाचे हे खळबळजनक ट्विट सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होते आहे. 

पूजा भट्ट तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. नुकतेच निर्माता हंसल मेहता यांच्या ट्विटला उत्तर देताना तिने कलाकारांची बदनामी करणार्‍यांना फटकारले होते. पूजाने लिहिले होते- 'हंसल मेहताशी मी सहमत आहे की कोणताही अभिनेता छोटा नाही. लोक खालीपणा दाखवण्यासाठी वर्कआउट अभिनेता, बी किंवा सी ग्रेड अभिनेता असे शब्द वापरले जातात.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Pooja bhatt tweet viral on drugs she writes people use drugs to make the pain of living go away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.